घरमहाराष्ट्रमुंबईत आतापर्यंत २२२ कोरोना योद्ध्यांचा मृत्यू

मुंबईत आतापर्यंत २२२ कोरोना योद्ध्यांचा मृत्यू

Subscribe

कोरोना काळात डॉक्टरां-बरोबरच आरोग्य कर्मचारी, रेल्वे, एसटीमधील कर्मचारी व अधिकारीही मोठ्या प्रमाणात सेवा देत आहेत. ही सेवा देताना अनेकांना कोरोनाची लागण झाली. मात्र यामध्ये आतापर्यंत मुंबई महापालिकेच्या उपायुक्त, सहायक आयुक्तांसह १०६ जणांचा, रेल्वेतील 107 जणांचा आणि एसटीतील 9 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे पालिका, एसटी व रेल्वेतील कर्मचारी व अधिकार्‍यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

मुंबईत कोरेानाचा पहिला रुग्ण मार्चमध्ये आढळून आल्यानंतर महापालिकेच्या २४ विभागांचे सहायक आयुक्त आणि वैद्यकीय अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनाच्या उपाययोजना राबवण्याचे काम हाती घेण्यात आले. आतापर्यंत महापालिकेतील 106 कर्मचार्‍यांचा मृत्यू झाला आहे. पालिकेतील २ हजार ६८६ अधिकारी, कर्मचार्‍यांसह कामगारांना कोरोनाची बाधा झाली.

- Advertisement -

त्यानंतर प्रभारी उपायुक्त व प्रमुख अभियंता शिरिष दिक्षित व एच-पूर्व विभागाचे सहायक आयुक्त अशोक खैरनार यांच्या सह १०६ अधिकारी,कर्मचारी व कामगारांचे कोरेानामुळे मृत्यू झाला आहे. यामुळे कर्मचार्‍यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागात 31, आरोग्य 27, अग्निशमन दल 8, सुरक्षा रक्षक 7 जणांचा समावेश आहे.

राज्य सरकारच्या आग्रहानंतर मध्य आणि पश्चिम रेल्वेनी 15 जूनपासून लोकल सेवा सुरु केली. त्यामुळे रेल्वेचे तिकीट तपासनीस, वर्कशॉप आणि कारशेडमधील कर्मचारी कामावर हजर राहत होते. पण रेल्वेलाही कोरोनाचा विळखा बसला असून, 20 जुलैपर्यंत 107 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये मध्य रेल्वेचे 80 आणि पश्चिम रेल्वेचे 27 जण आहेत. मृतांमध्ये कर्मचार्‍यांसह त्यांचे कुटुंबीयांचाही समावेश आहे. रेल्वेच्या बाबू जगजीवन राम रुग्णालयात 1 हजार 561 रेल्वे कर्मचार्‍यांना दाखल केले असून, यातील 911 कर्मचार्‍यांनी कोरोनावर मात केली आहे. परिणामी रेल्वे कर्मचार्‍यांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे.

- Advertisement -

रेल्वे, पालिकेप्रमाणे एसटी कर्मचार्‍यांचेही मृत्यू झाले आहेत. एसटी महामंडळाच्या 332 कर्मचार्‍यांना करोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 195 कर्मचारी उपचार घेउन बरे झाले आहेत. आतापर्यंत 9 कर्मचार्‍यांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये मुंबई विभागातील एक, ठाणे विभागातील 2 जणांचा समावेश आहे.

मृतांच्या नातेवाईकांना ५० लाखांची विमा संरक्षणाची मदत मिळेपर्यंत त्यांचे पगार सुरूच ठेवावेत. आतापर्यंत मृतांचे नातेवाईक क्वारंटाईन असल्याने तसेच मृत्यू प्रमाणपत्र मिळाले नसल्याने त्यांची कागदपत्रे सादर केलेली नाही. त्यामुळे ही रक्कम मिळण्यास विलंब होऊ शकतो.
– प्रदीप नारकर, चिटणीस, म्युनिसिपल मजदूर युनियन

पालिकेतील विभागनिहाय मृत कर्मचार्‍यांची संख्या
घनकचरा व्यवस्थापन 31
आरोग्य -27
अग्निशमन दल -8
सुरक्षा रक्षक -7
झोन 1 -5
झोन 2 -4
अन्य -21

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -