घरदेश-विदेशNew Year 2024 : सुकन्या योजनेसह FD वरील व्याजदरात वाढ; वर्षाच्या सुरुवातीलाच...

New Year 2024 : सुकन्या योजनेसह FD वरील व्याजदरात वाढ; वर्षाच्या सुरुवातीलाच नागरिकांना दिलासा

Subscribe

नवी दिल्ली : नवीन वर्षात आर्थिक गुंतवणूक करण्याच्या विचारात असलेल्या लोकांना सरकारने एक आनंदाची बातमी दिली आहे. सरकारने सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Scheme) आणि मुदत ठेव (FD Scheme) योजनेवरील व्याजदरात वाढ करत वर्षाच्या सुरुवातीलाच मोठी भेट दिली आहे. अर्थ मंत्रालयाने (Finance Ministry) चालू आर्थिक वर्षातील (Financial Year) सुकन्या समृद्धी योजना आणि तीन वर्षांच्या मुदत ठेव योजनेचे व्याजदर चौथ्या तिमाहीसाठी (जानेवारी-मार्च) वाढ करत सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. (New Year 2024 Increase in interest rate on FD with Sukanya Yojana Relief to citizens at the beginning of the year)

हेही वाचा – गुजरातींचा योगानंतर आता सूर्यनमस्कारात Guinness World Record; मोदींनीही दिल्या शुभेच्छा

- Advertisement -

अर्थ मंत्रालयाने सुकन्या समृद्धी योजनेवरील व्याजदरात 0.20 टक्के आणि एफडीवरील व्याजदरात 0.10 टक्के वाढ केली आहे. याशिवाय इतर सर्व छोट्या योजनांचे दर अपरिवर्तित राहतील, अशीही माहिती अर्थ मंत्रालयाने दिली आहे. केंद्रीय वित्त मंत्रालयाने सांगितले की, सुकन्या समृद्धी योजना आणि 3 वर्षांच्या मुदत ठेवींसाठी किरकोळ वाढीसह बहुतेक योजनांमधील व्याजदर समान पातळीवर आहेत.

सुकन्या योजनेच्या व्याजदरात वाढ

सुकन्या योजनेचा व्याजदर 8.2 टक्के करण्यात आला आहे, तर या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीसाठी मुदत ठेवीचा दर 7.1 टक्के असेल. याआधी सुकन्या समृद्धी योजना आणि तीन वर्षांच्या कालावधीसह अंतर्गत ठेवींवर व्याज अनुक्रमे 8.0 टक्के आणि 7.1 टक्के होते.

- Advertisement -

हेही वाचा – Prakash Ambedkar : आपण शेळी, मेंढी नसून सिंह आहोत…; कोरेगाव भीमातून आंबेडकरांची गर्जना

पीपीएफमध्ये कोणताही बदल नाही

जनरल प्रॉव्हिडंट फंड (PPF) च्या दरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पीपीएफचे दर एप्रिल-जून 2020 मध्ये बदलले होते, त्यानंतर दर कायम आहेत. एप्रिल-जून 2020 मध्ये हा दर 7.1 टक्क्यांवरून 7.9 टक्के करण्यात आले होते. रिझर्व्ह बँकेने मे 2022 पासून पॉलिसी रेट 2.5 टक्क्यांनी वाढवले होते ​​आणि बँकांनाही ठेवींवरील व्याजदर बदलण्यास भाग पाडले होते. भारतीय रिझर्व्ह बँकेने यावर्षी फेब्रुवारीपासून चलनविषयक धोरण समितीच्या पाच बैठकांमध्ये धोरणात्मक दरांवर स्थिरता राखली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -