घरदेश-विदेशगुजरातींचा योगानंतर आता सूर्यनमस्कारात Guinness World Record; मोदींनीही दिल्या शुभेच्छा

गुजरातींचा योगानंतर आता सूर्यनमस्कारात Guinness World Record; मोदींनीही दिल्या शुभेच्छा

Subscribe

गुजरात : गुजरातमधील (Gujrat) लोकांनी याआधी एकत्र येत योगा करत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवला होता. यानंतर आता या राज्यातील लोकांनी सूर्यनमस्कार करत गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केली आहे. या विशेष कामगिरीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी गुजरातच्या जनतेचे अभिनंदन केले आहे. (Guinness World Record of Gujaratis in Surya Namaskar after Yoga Narendra Modi also gave his best wishes)

हेही वाचा – Google Maps : नवीन वर्षात गुगल मॅपचे ‘हे’ फीचर होणार बंद

- Advertisement -

गुजरातमधील पाटणच्या दक्षिणेस 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या मोढेरा गावात मोढेरा सूर्य मंदिर तयार करण्यात आले आहे. हे सूर्यमंदिर अद्वितीय स्थापत्य आणि कारागिरीचे अतुलनीय उदाहरण आहे. नववर्षाच्या पहिल्या पहाटेच्या निमित्ताने या मंदिरात सूर्यनमस्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने लोकांनी सहभाग नोंदवला. विशेष गोष्ट म्हणजे नवीन वर्षाचा सूर्योदय होताच गुजरातमधील लोकांनी आपल्या नावावर गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची नोंद केली. मोठ्या संख्येने लोकांनी एकत्र येत सूर्यनमस्कार घातले. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि गृहराज्यमंत्री हर्ष संघवी हे या विशेष कामगिरीचे साक्षीदार बनले.

सूर्यनमस्कारची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

नव वर्षाच्या पहिल्या पहाटे मोढेरा सूर्य मंदिरात सूर्यनमस्काराचा कार्यक्रम झाला. यामध्ये मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे निरीक्षक स्वप्नील डांगरीकरही हेही याठिकाणी उपस्थित होते. त्यांनी सांगितले की, मी याठिकाणी सूर्यनमस्कार करणार्‍या सर्वाधिक लोकांच्या रेकॉर्डची पडताळणी करण्यासाठी आलो आहे. हा नवा विक्रम आहे. हा विक्रम यापूर्वी कोणीही मोडण्याचा प्रयत्न केला नव्हता. सर्व पुरावे तपासल्यानंतर एवढ्या मोठ्या संख्येने लोकांनी एकत्रितपणे सूर्यनमस्कार केल्याने एक नवा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड तयार झाल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी माहिती स्वप्नील डांगरीकर यांनी दिली.

हेही वाचा – Japan Earthquake : जपानमध्ये 7.6 रिश्टर स्केलचा भूकंप; त्सुनामीचा इशारा

पंतप्रधानांनी केले अभिनंदन 

गुजरातमधील लोकांनी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करताना म्हटले की, गुजरातने उल्लेखनीय कामगिरीसह नवीन वर्षाचे स्वागत केले आहे. गुजरातमधील लोकांनी 108 ठिकाणी एकाच वेळी सूर्यनमस्कार घालण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे. आपल्या सर्वांना माहित आहे की, आपल्या संस्कृतीत 108 क्रमांकाचे विशेष महत्त्व आहे. स्थळांमध्ये प्रतिष्ठित मोढेरा सूर्य मंदिराचा समावेश होता, जेथे अनेक लोक उपस्थित होते.

गृहराज्यमंत्री हर्ष संघवी यांच्याकडून आनंद व्यक्त 

राज्याच्या नावावर आणखी एक नवा विक्रम झाल्याबद्दल गृहराज्यमंत्री हर्ष संघवी यांनी आनंद व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, आज गुजरातमध्ये सर्वाधिक लोकांनी एकाचवेळी सूर्यनमस्कार करण्याचा नवा विक्रम केला आहे. 2023 मध्ये गुजरातच्या सर्वाधिक लोकांनी एकत्र योग करण्याचा असाच विक्रमकेला होता आणि आज पुन्हा एकदा गुजरातने विश्वविक्रम केला आहे. हा कार्यक्रम 108 ठिकाणी आयोजित करण्यात आला होता, जिथे लाखो लोकांनी एकत्रितपणे सूर्यनमस्कार केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -