घरमहाराष्ट्र'पहिला प्रयोग तुझ्या घर कोंबड्या मुख्यमंत्र्यावर कर'; नितेश राणेंचा सेनेच्या आमदारावर पलटवार

‘पहिला प्रयोग तुझ्या घर कोंबड्या मुख्यमंत्र्यावर कर’; नितेश राणेंचा सेनेच्या आमदारावर पलटवार

Subscribe

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना जीभ घसरली. मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते, तर मी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबून टाकले असते, असं वादग्रस्त विधान गायकवाड यांनी केलं. यावर आता भाजपचे आमदार नितेश राणेंनी देखील पलटवार केला आहे. पहिला प्रयोग तुझ्या घर कोंबड्या मुख्यमंत्र्यावर कर, अशा शब्दांत राणेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.

नितेश राणे यांनी संजय गायकवाड यांच्यावर वादग्रस्त वक्तव्यावर ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. “देवेंद्रजींच्या जवळ जाणे हे तर लांबच राहिले..हे या गायकवाडला कोण सांगेल..पहिला प्रयोग तुझ्या घर कोंबडा मुख्यमंत्र्यावर कर आणि मग बाकीचे बघू..जंतू पार्सल पाठवतो मातोश्री वर..कुठे घालायची तिथे घाल..” अशा शब्दांमध्ये नितेश राणे यांनी पलटवार केला.

- Advertisement -

संजय गायकवाड बुलढाण्यात बोलत होते. यावेळी त्यांनी लसींबाबत, औषधांबाबत महाराष्ट्रा सोबत होत असलेल्या दुजाभावाबद्दल जाहीरपणे संताप व्यक्त केला. मात्र, यावेळी त्यांचा तोल घसरला. मला करोनाचे विषाणू सापडले तर मी ते देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबून टाकले असते, इतका तिरस्कार ह्या लोकांबद्दल माझ्या मनामध्ये निर्माण झाला आहे, असं गायकवाड म्हणाले. ज्याच्या घरातला माणूस मरतो, ज्याच्या घरातील कर्ता पुरुष जातो, त्याला समजतं की करोना काय आहे. त्यामुळं भाजपच्या लोकांनी राजकारण थांबवावं, असं आवाहन देखील संजय गायकवाड यांनी केलं.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -