घरमहाराष्ट्रनाशिक - उ. महाराष्ट्रलॉकडाऊनच्या काळात जगातील टॉपच्या विद्यापीठांतून ७० कोर्सेस पूर्ण

लॉकडाऊनच्या काळात जगातील टॉपच्या विद्यापीठांतून ७० कोर्सेस पूर्ण

Subscribe

रमेश बनसोडेंची ‘बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नों

संगमनेर : दोन महिन्यांच्या लॉकडाऊन काळात उद्योग व्यवसाय ठप्प झाल्याने अनेकांना मोकळा वेळ होता. याकाळात व्हाट्सअ‍ॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम आदी सोशल मीडियावर अनेकांनी आपला वेळ घालविला. मात्र रमेश बनसोडे यांनी या वेळेचा सदुपयोग करीत जगातील टॉपच्या विद्यापीठांतून वेगवेगळ्या विषयात तब्बल ७० सर्टिफिकेट कोर्सेस पूर्ण केले आहेत.

करिअर डेव्हलपमेंट कॉलेज लंडन, द ओपन यूनिव्हर्सिटी यूके, कॉर्पोरेट फायनान्स इन्स्टिट्यूट कॅनडा, यूरोपियन ओपन यूनिव्हर्सिटी जर्मनी येथून हॉटेल मॅनेजमेंट, टाईम मॅनेजमेंट, मार्केटिंग मॅनेजमेंट, मानसशास्त्र, कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट, ग्रोथ माईंड सेट, ब्लॉग अ‍ॅथोरिटी, बेसिक न्यूट्रेशन, सायबर क्राईम, संस्थांत्मक वर्तन आणि मानव संसाधन व्यवस्थापन, सोशल मीडिया मार्केटिंग, द सायकॉलॉजी ऑफ सायबर क्राईम, इन्व्हेस्टमेंट रिस्क, क्राईम्स ऑफ द पॉवरफुल, द प्रॉब्लेम विथ क्राईम, हुमन राईट अँड लॉ, बँकिंग प्रॉडक्ट अँड सर्व्हिसेस, ब्रँड मॅनेजमेंट, इन्वेस्टिगेशन सायकॉलॉजी, इंटरनॅशनल फायनान्स, इंटरनॅशनल बिझनेस मॅनेजमेंट, डिजिटल मार्केटिंग, इफेक्टिव्ह कमुनिकेशन, डाटा एन्ट्री आदी सर्टिफिकेट कोर्सेस पूर्ण करून रमेश बनसोडे यांनी ऑनलाईन ई-लर्निंग क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली असून नवीन रेकॉर्ड केला आहे. त्यांची जागतिक स्तरावर 360 बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -