घरमहाराष्ट्रNPCI UPI Payment : फक्त म्हणा Hello UPI; आता व्हॉइस कमांडद्वारे...

NPCI UPI Payment : फक्त म्हणा Hello UPI; आता व्हॉइस कमांडद्वारे करता येणार पेमेंट

Subscribe

आता तुम्ही बोलून देखील UPI पेमेंट करू शकणार आहात. आता केवळ, फोन कॉलच्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर करता येणार आहेत. विशेष म्हणजे, यासाठी इंटरनेटचीही गरज नसणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये याबाबात घोषणा केली.

मुंबई: देशात डिजिटल पेमेंट क्रांती आणणाऱ्या UPI मध्ये आता आणखी अनेक नवनवीन फीचर्स जोडण्यात आले आहेत. आत्तापर्यंत तुम्ही QR कोड किंवा मोबाईल नंबरद्वारे UPI पेमेंट करत होता, पण आता तुम्ही बोलून देखील UPI पेमेंट करू शकणार आहात. आता केवळ, फोन कॉलच्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर करता येणार आहेत. विशेष म्हणजे, यासाठी इंटरनेटचीही गरज नसणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये याबाबात घोषणा केली. यासोबतच, UPI बाबत आणखी नवे फीचर्सदेखील यावेळी लॉंच करण्यात आले. (NPCI UPI Payment Just Say Hello UPI Payments can now be made through voice commands )

नमस्कार! UPI लाँच

Hello UPI लॉंच करताना, शक्तीकांत दास म्हणाले की, तुम्ही व्हॉइस कमांडद्वारे देखील UPI पेमेंट करू शकाल. NPCI ने सांगितले की सध्या हे उत्पादन फक्त हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये उपलब्ध आहे, परंतु लवकरच ते इतर अनेक भाषांमध्ये देखील उपलब्ध केले जाईल.

- Advertisement -

बिलपे कनेक्ट हे उपकरण वापरकर्त्यांना राष्ट्रीयीकृत बिल पेमेंट नंबरद्वारे फोन कॉलवर बिल भरण्याची परवानगी देईल. ग्राहक या नंबरवर कॉल करू शकतील आणि UPI वापरून व्हॉइस-सक्षम कमांडद्वारे किंवा त्यांच्या फोनवर अंक दाबून पेमेंट करू शकतील.

यासोबतच युपीआयवर क्रेडिट लाईन हे फीचरही लॉंच करण्यात आलं आहे. या माध्यमातून युजर्सना बँकांकडून प्री-अप्रूव्ह्ड लोन मिळू शकतं. सोबतच, आधीपासून घेतलेल्या कर्जाच्या सहाय्यानं यूपीआय प्लॅटफॉर्मवर ट्रान्झॅक्शन करता येईल. यासोबतच लाईट एक्स नावाचं आणखी एक प्रॉडक्ट NPCI ने लॉंच केलं आहे. इंटरनेटशिवाय व्यवहार करण्यासाठी याचा वापर करता येईल.

- Advertisement -

बँक खात्यात पैसे नसतानाही करता येणार आर्थिक व्यवहार

युनिफाइड पेमेंट इंटरफेस प्रणाली अर्थात UPI चा वापर वाढला आहे. परंतु ऑनलाईन व्यवहार करताना तुमच्या बँक खात्यात पैसे असणेही तितकेच आवश्यक आहे. पण आता पैसे नसले तरी तुम्हाला पेमेंट करता येणार अशी सुविधा बँकांकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी खरं तर भारतीय रिझर्व्ह बँकेकडून यासाठी मंजुरी मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) प्रणालीमधील व्यवहारांसाठी बँकांद्वारे जारी केलेल्या प्री अप्रुव्ह्ड क्रेडिट लाइनला मंजुरी दिली देण्यात आली असली तरी आता रिझर्व्ह बँकेकडून मंजुरी मिळाल्यानंतर युपीआयमध्ये व्यवहारांसाठी बँकांद्वारे दिली जाणारी प्री अप्रुव्ह्ड लोन सेवा जोडली जाईल. ज्यानंतर बँकांना ग्राहकाच्या खात्यात पैसे नसतानाही पेमेंट करता येणार आहे.

(हेही वाचा: बँक खात्यात पैसे नसतानाही करता येणार आर्थिक व्यवहार, जाणून घ्या कसे ते… )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -