घरमहाराष्ट्रतर ऑक्सिटॉसीन इंजेक्शनचा दुरुपयोग होऊ शकतो!

तर ऑक्सिटॉसीन इंजेक्शनचा दुरुपयोग होऊ शकतो!

Subscribe

ऑक्सिटॉसीनसारख्या इंजेक्शनची निर्मिती कर्नाटक अॅन्टीबायोटिक प्रायव्हेट लिमिटेड या एकमेव सरकारी कंपनीकडून होते. ऑक्सिटॉसीन या इंजेक्शनची विक्री सरकारकडून सर्वत्र खुली करण्यात आली असून औषधांच्या दुकानातही त्याची विक्री होणार आहे. आतापर्यंत हीच कंपनी प्रत्येक रुग्णालयात इंजेक्शनचा पुरवठा करत होती. पण, नुकत्याच जारी झालेल्या सुचनेनुसार आता औषधांच्या दुकानांमध्ये देखील हे इंजेक्शन उपलब्ध करण्यात येणार आहे.

ऑक्सिटॉसीन या इंजेक्शनची विक्री सरकारकडून सर्वत्र खुली करण्यात आली असून आता औषधांच्या दुकानातही त्याची विक्री होणार आहे. पण, हे औषध डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नसल्याचे त्याचवेळी स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, या इंजेक्शनचा वापर डॉक्टरांकडूनच व्हावा, औषधांच्या दुकानांमधून त्याची विक्री खुली केल्यास गैरवापर होऊ शकतो, असा आक्षेप वैद्यकीय तज्ज्ञांनी घेतला आहे. यासोबतच ऑल फुड अॅण्ड ड्रग लायन्सस होल्डर फाऊंडेशनकडूनही केमिस्टमध्ये होणाऱ्या या इंजेक्शनच्या विक्रीला विरोध केला आहे.

ऑक्सिटॉसीन इंजेक्शन औषधांच्या दुकानातून मिळावे, अशी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. आतापर्यंत हे इंजेक्शन केवळ रुग्णालये आणि डॉक्टरांनाच उपलब्ध होत होते. पण, अशा उपलब्धतेवर ऑल फुड अॅण्ड ड्रग लायसन्स होल्डर फाऊंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अभय पांडे यांनी आक्षेप घेतला आहे.

- Advertisement -

काही औषध दुकान संघटनांच्या मागणीमुळे ऑक्सिटॉसीन हे इंजेक्शन केमिस्टमध्ये उपलब्ध झाली आहेत. हे औषध दुकान संघटनांचे दबावतंत्र असून त्याचा विरोध केला जातोय. ऑक्सिटॉसीन या इंजेक्शनचा वापर महिलांसाठी केला जात असून प्रसुतीच्या वेळी होणाऱ्या अतिरिक्त रक्तस्त्रावाला प्रतिबंध करण्यासाठी केला जातो. त्यामुळे रुग्णालयांमधील डॉक्टरच त्याचा वापर अधिक चांगल्या प्रकारे करु शकतात.  – प्रा. डॉ. कामाक्षी भाटे, केईएम रुग्णालय

शेतातील भाज्यांची आणि फळांची उत्पादनक्षमता वापरण्यासाठी ऑक्सिटॉसीन इंजेक्शनचा शिडकाव भाज्यांवर केला जातो. यामुळे उत्पादन क्षमता वाढते. तसेच, दूध देणाऱ्या प्राण्यांना हे इंजेक्शन दिल्यास त्यांचे देखील उत्पादन वाढते. इंजेक्शनचा वापर करुन अवाजवी उत्पादन केलेल्या भाज्या किंवा दुग्धजन्य पदार्थांचे सेवन केल्यास आजार होण्याची शक्यता आहे. शिवाय, कॅन्सरसारखा दुर्धर रोग होऊ शकतो, असे संशोधनातून समोर आले आहे.  – अभय पांडे, ऑल फुड अॅण्ड ड्रग लायन्स होल्डर फाऊंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -