घरताज्या घडामोडीरस्त्याच्या कडेला उभं राहून पाहणी करणं म्हणजे बांधावर जाणे नव्हे, जयंत पाटलांवर...

रस्त्याच्या कडेला उभं राहून पाहणी करणं म्हणजे बांधावर जाणे नव्हे, जयंत पाटलांवर पंकजा मुंडेंची टीका

Subscribe

शेतकऱ्यांना सरसकट मदत दिली पाहिजे. शेतकऱ्यांच्या शेतमालाचे नुकसान, जमीनीच्या नुकसानीची हमी दिली पाहिजे.

औरंगाबादसह मराठावाडा आणि विदर्भात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे. शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झालं आहे. महाविकास आघाडी सरकारमधील नेते शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करत आहेत. रस्त्याच्या कडेला उभं राहून शेतीच्या नुकसानीची पाहणी करणे म्हणजे बांधावर जाऊन पाहणी करणे नव्हे असा टोला भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादी नेते आणि पालकमंत्री धनंजय मुंडे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना लगावला आहे. मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी करावी तसेच शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केली आहे.

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं आहे की, जिल्ह्यात सध्या गंभीर परिस्थिती आहे. मदत मिळण्याचा विषय नंतर आहे परंतु सध्या लोकांना दिलासा दिला पाहिजे. अशा परिस्थितीमध्ये शासन बांधावर आले पाहिजे कारण ते बांधावर आल्यावर प्रशासन कामाला लागते. शासन बाहेर आल्यावर प्रशासन जोराने कामाला लागते. आता लोकांची अत्यंत भयानक परिस्थिती आहे. लोकांच्या घरातील सामान वाहून गेले आहे. कोणाच्या शेतातील पीक वाहून गेलं आहे. शेतकऱ्यांच्या शेतजमीन देखील वाहून गेले आहेत. पडझड झाली आहे. गुरं ढोर वाहून गेली आहेत. रस्त्यांचे नुकसान झालं असून बंधारे देखील फुटलेले आहेत. यामुळे सरकारने बांधावर यायया पाहिजे आणि अत्यंत जलद निर्णय घेऊन लोकांना न्याय दिला पाहिजे.

- Advertisement -

जयंत पाटील, धनंजय मुंडेंवर निशाणा

राष्ट्रवादी नेते आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील मागील दोन दिवसांपासून औरंगाबाद जिल्ह्यात असून नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा करत आहेत. यावर पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे की, ते बांधावर फिरत आहेत याचे कारण काय? ते पाहा. रस्त्यावर जात असताना गाडी थांबवून रस्त्याच्या बाजूच्या शेतामध्ये पाहणी करणे म्हणजे बांधावर फिरणे नाही. मुख्यमंत्र्यांचे मंत्रिमंडळ असतं, मुख्यमंत्री प्रत्येकाच्या बांधावर जाऊन पाहणी करणे अपेक्षित नाही परंतु त्यांचे मंत्री प्रत्येकाच्या बांधावर जाऊन पाहणी करु शकतात. पालकमंत्र्यांनी त्या जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारलेलं असते. राजकीय कार्यक्रमादरम्यान रस्त्यालगत असलेल्या शेताच्या बांधावर जाऊन पाहणी करणं म्हणजे बांधावर जाऊन पाहणी करणे म्हणता येणार नाही असे पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

जयंत पाटील बीडला न्याय देतील

जयंत पाटील हे ज्येष्ठ मंत्री असून अनेक वर्षांचा अनुभव असून त्यांच्याकडे जलसंपदा खात्याची जबाबदारी आहे. जलसंपदा खात्यातून जे काही नुकसान झालं आहे. याबाबत जयंत पाटील यांनी आढावा मागून घेतला आणि पुढे काय तरतूद केली पाहिजे याबाबत माहिती घेतली तर बीड जिल्ह्याला ते न्याय देण्यासाठी आवश्यक पावलं उचलतील अशी माझी अपेक्षा असल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी

शेतकऱ्यांना सरसकट मदत दिली पाहिजे. शेतकऱ्यांच्या शेतमालाचे नुकसान, जमीनीच्या नुकसानीची हमी दिली पाहिजे. अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकारने उभे राहिले पाहिजे. जमीन वाहून गेली आहे, रस्ते वाहून गेले, पूल तुटले, बंधारे वाहून गेले आहेत. या सगळ्याचा विचार करुन वेगळा बजेट केला पाहिजे अशी माझी अपेक्षा असल्याचे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा : पुरामुळे औरंगाबादमध्ये मोठं नुकसान, ओला दुष्काळ जाहीर करण्याची खासदार जलील यांची मागणी


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -