घरमहाराष्ट्रपनवेल-कर्जत दुहेरी मार्ग धिम्या गतीवर

पनवेल-कर्जत दुहेरी मार्ग धिम्या गतीवर

Subscribe

भूसंपादनाच्या प्रक्रियेत अडकला प्रकल्प

पनवेल-कर्जत रेल्वे मार्गाला अद्यापही जमीन संपादनाची प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे या प्रकल्पाची कामे अतिशय धीम्या गतीने सुरु आहेत. त्यामुळे पनवेल-कर्जत दुहेरी मार्गाच्या कामाचा खर्च वाढत जात आहेत. या पनवेल-कर्जत दुहेरी मार्गाला 2015 च्या अर्थसंकल्पात मंजुरी मिळाली होती. मात्र जमीन संपादनाच्या अडचणीत सापडल्यामुळे प्रवाशांना पुढील पाच वर्षे वाट पाहावी लागणार आहे.

मध्य रेल्वे मार्गावरील पनवेल ते कर्जत सध्या एकच मार्गिका उपलब्ध आहे.या मार्गाचा लांब पल्ल्याच्या गाड्या किंवा मालवाहतुकीसाठी वापर होत असतो. कर्जत आणि पनवेलमधील प्रवाशांसाठी व्हाया ठाणे किंवा कुर्ला मार्गे लोकलने जावे लागते. अन्यथा रस्ते वाहतुकीचा पर्याय निवडावा लागतो. मात्र त्यात बराच वेळ जातो. जर पनवेल ते कर्जत अशी थेट लोकल सुरू झाल्यास त्याचा फायदा अनेक प्रवाशांना मिळू शकतो. त्यासाठी एमयूटीपी-3 मध्ये पनवेल-कर्जत दुहेरी मार्गाच्या प्रकल्पाचा समावेश आहेत. एमयूटीपी 3 प्रकल्पांचा एकूण खर्च 10 हजार 947 कोटी रुपये आहेत.

- Advertisement -

ज्यात पनवेल ते कर्जत दुहेरी मार्गाचा खर्च 2 हजार 783 कोटी रुपये आहे. मुंबई रेल विकास कॉर्पोरेशनच्या वतीने भूसंपादनासाठीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे देण्यात आला. मागील वर्षभरापासून भूसंपादनाची प्रक्रिया सुरू असून अद्याप ती पूर्ण झालेली नाही. यासाठी लागणारा निधीदेखील संबंधित विभागाला देण्यात आला आहे. पनवेल तालुक्यातील उसर्ली खुर्द, चिखले, सांगडे, बेलवली, पाली बुद्रुक, भिंगार, भिंगारवाडी, मोहपे, पोयंजे, बारवली, भेरले आदी 11 गावांमधील जमिनी संपादित करण्यात येणार असे वरिष्ठ अधिकार्‍याकडून सांगण्यात आले आहे.मात्र या जमीन संपादनाची प्रक्रिया धीम्या गतीने सुरू असल्यामुळे या पनवेल-कर्जत दुहेरी मार्गाला कामासाठी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -