घरमहाराष्ट्रएकवीरा देवीच्या मंदिरात पुजार्‍याकडून दानपेटीवर ठेवले जाणारे ताट कायमचे बंद

एकवीरा देवीच्या मंदिरात पुजार्‍याकडून दानपेटीवर ठेवले जाणारे ताट कायमचे बंद

Subscribe

धर्मादाय आयुक्तांकडून आदेश

लाखो भाविकांचे कुलदैवत असलेल्या श्री एकविरा देवीच्या मंदिरात दानपेटीवर पुजार्‍याकडून ठेवले जाणारे ताट कायमचे बंद करण्याचा आदेश धर्मादाय आयुक्त, पुणे यांनी दिला आहे. तशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र कोळी संघाचे अध्यक्ष अनंत तरे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. श्री एकविरा देवस्थान ट्रस्टला अत्यल्प उत्पन्न मिळत आहे. त्यातही देवीच्या दानपेटीतील 75 टक्के पैसे मंदिरातील पुजारी यांना मिळतात. उर्वरित 25 टक्के रक्कम देवस्थान ट्रस्ट भाविकांच्या सुखसुविधेसाठी वापरते. मात्र दानपेटीवर ताट ठेवल्याने भाविक दानपेटीत पैसे न टाकता, त्या ताटात ठेवतात.

हे पैसे पुजार्‍याला मिळतात. त्याचा हिशोब नसतो. त्यामुळे दानपेटीत कमी रक्कम जमा होते. त्यामुळे अत्यंत कमी रकमेत भाविकांना सोयी सुविधा पुरविताना अडचणी उद्भवत आहेत. या विरोधात ट्रस्टचे अध्यक्ष अनंत तरे यांनी धर्मादाय आयुक्त पुणे यांच्याकडे तक्रार दाखल केली होती.गेल्या अनेक वर्षापासून पुजारी मंडळींनी दानपेटीवर ताट ठेवणे सुरू केले होते. यासंदर्भात पुजार्‍यांना वारंवार विनंती करूनही ताट बंद केले नव्हते. खुद्द पुजारी प्रतिनिधी विजय देशमुख यांनी दानपेटीवरील ताट बंद करण्याच्या विषयावर देवस्थानच्या अध्यक्षांना अर्ज दिला होता, असेही तरे यांनी सांगितले.

- Advertisement -

ट्रस्टच्या पदाधिकार्‍यांनी मुंबई हायकोर्टात दाखल केलेल्या जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान मुंबई हायकोर्टाच्या निर्देशानुसार ट्रस्टचा दर दिवशीचा कारभार करण्यासाठी त्रिसदस्यीस समिती नेमण्यात आली होती. त्यांना ट्रस्टने कायम स्वरूपी ताट बंद करण्याचे निवेदन दिले. त्याद्वारे दानपेटीतील 75 टक्के रक्कम पुजार्‍यांना मिळते, ती देवस्थानाला व भाविकांच्या विकास कामांकरता मिळावी, घटनेत बदल करावा तसेच लाभार्थी ट्रस्टींना विश्वस्त म्हणून घेऊ नये, अशा मागण्या करण्यात आल्या. या संदर्भात न्याय मिळण्यासाठी 14 भाविकांच्यावतीने मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे, असे तरे यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -