घरताज्या घडामोडीPhone Tapping Case: मविआ स्थापनेआधी संजय राऊत, एकनाथ खडसेंचे ६० दिवस फोन...

Phone Tapping Case: मविआ स्थापनेआधी संजय राऊत, एकनाथ खडसेंचे ६० दिवस फोन टॅप

Subscribe

राजकीय नेतेमंडळींच्या फोन टॅपिंगच्या प्रकरणात आणखी बड्या नेत्यांचे फोन टॅप झाल्याची माहिती समोर येत आहे. अवैध फोन टॅपिंग प्रकरणात शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मोठ्या नेत्यांचे फोन टॅप केल्याची कबुली जबाब नोंदवण्यात आले आहे. महाविकास आघाडी सरकार स्थापनेपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे फोन टॅपिंग झाल्याची माहिती समोर आली आहे. तब्बल एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीसाठी फोन टॅप करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई पोलिसांकडून फोन टॅपिंग प्रकरणाचा तपास सुरू आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांकडून तत्कालीन एसीएस होम एस कुमार यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. पहिल्यांदा झालेल्या फोन टॅपिंगच्या प्रकारात सात दिवस फोन टॅपिंग करण्यात आला. त्यानंतर दुसऱ्या एसीएस होमच्या परवानगीने ६० दिवस फोन टॅप करण्यात आला. संजय राऊत आणि एकनाथ खडसे यांचे पोन टॅपिंग हे एसडीआयच्या स्वरूपात करण्यात आल्याची कबुली कुमार यांनी आपल्या जबाबात दिली आहे. संजय राऊत यांचा फोन ६० दिवस टॅप करण्यात आला. तसेच एकनाथ खडसे यांचा ६७ दिवस फोन टॅप करण्यात आला.

- Advertisement -

फोन टॅपिंग होत असल्याचे कळू नये म्हणून एसडीआयकडून चुकीच्या नावाने विनंती करण्यात आल्याचेही एबीपी माझा या वाहिनीने दिली आहे. आतापर्यंत या फोन टॅपिंगच्या प्रकरणात दहा जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. तसेच आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांचाही जबाब या प्रकरणात नोंदवण्यात आला आहे. एकनाथ खडसे आणि संजय राऊत यांचाही जबाब या प्रकरणात नोंदवण्यात आला आहे.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -