घरमहाराष्ट्रआव्हाड, मलिकांकडून अहवालाचे स्क्रिप्टिंग, कुंटेंची फक्त सही - फडणवीस

आव्हाड, मलिकांकडून अहवालाचे स्क्रिप्टिंग, कुंटेंची फक्त सही – फडणवीस

Subscribe

फोन टॅपिंग प्रकरणाचा अहवाल काल गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला. या अहवालावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीकास्त्र डागलं आहे. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी जो अहवाल दिला तो त्यांनी तयार केलाच नाही. तो अहवाल गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी तो अहवाल तयार केला आणि त्यावर सीताराम कुंटे यांनी सही दिली, अशी टीका फडणवीस यांनी केली.

सीताराम कुंटे यांना मी चांगला ओळखतो. सीताराम कुंटे यांनी जो अहवाल तयार केलं, तो वाचल्यानंतर मी तो अहवाल कुंटे यांनीच केला हे मला मान्य नाही. तो अहवाल जितेंद्र आव्हाड आणि नवाब मलिक यांनी केला आणि त्यावर कुंटे यांनी सही केली आहे. कारण त्या अहवालात अनेक चुका आहेत. या अहवालात टेलीग्राफ कायद्यातील कोणतातरी गुन्हा होणार आहे, याची माहिती जर असेल तर टॅपिंग केलं जाऊ शकतं, हे वाक्य त्यातून गायब केलं आहे, असं फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

फोन टॅपिंगचा अहवाल हा नबाव मलिक यांनी लिक केला. अनेक पत्रकारांनी तो अहवाल मला पाठवला. हा अहवाल मलुक यांनी पाठवला, असं मला सांगितला. त्यामुळे हा अहवाल नवाब मलिक यांनी पब्लिक करण्याचं काम केलं.


हेही वाच – Bhandup Dream Mall Fire : दुर्घटनेला BMC, सरकारचा अक्षम्य हलगर्जीपणा जबाबदार – फडणवीस

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -