घरट्रेंडिंगCoWin App वर यापुढे दुसऱ्या Covid-19 डोसचे रिमाईंडर मिळणार नाही; कसा ठेवाल...

CoWin App वर यापुढे दुसऱ्या Covid-19 डोसचे रिमाईंडर मिळणार नाही; कसा ठेवाल ट्रॅक?

Subscribe

देशभरात कोरोनाचा कहर सुरू असून देशाच्या चिंतेत अधिक भर पडत आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यात कोरोनाचं थैमान सुरू आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू नये यासाठी कित्येक राज्यात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली असून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत कोरोना लसीकरणासंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. कोरोना लसीचा पहिला डोस तुम्ही घेतला असेल आणि आता दूसरा डोस घ्यायचा असेल तर तुम्हाला एका विशिष्ट गोष्टीकडे लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. कारण आता कोरोना लसीचा दूसरा डोस घेण्यासाठी कोविन अॅप तुम्हाला रिमांईंडर करणार नाही म्हणजे त्याचा कोणताही अलर्ट देणार नाही, असे कोरोना लसीकरण समूहाचे अध्यक्ष आर एस शर्मा यांनी अशी माहिती गुरूवारी ANI या वृत्तसंस्थेला दिली आहे.

असा ठेवा लसीचा दुसरा डोस घेण्याचा ट्रॅक?

जर तुम्हाला कोरोना लसीचा दूसरा डोस घ्यायचा असेल तर, या दोन डोसमधील ठराविक अंतर केंद्राने केलेल्या शिफारसीनुसार तुम्ही स्वतःचे वेळापत्रक स्वतः तयार करायचे आहे. यासह केंद्र सरकारने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना सांगितले की, कोव्हीशिल्ड लसीचे दुसरा डोस सहा ते आठ आठवड्याच्या अंतराने दिला पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, कोरोनाचा वाढता संसर्ग असताना कोरोना लसीकरण मोहीम देखील मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. या लसीकरण मोहीमेतंर्गत काही लोकांनी कोरोना लसीकरणाचा दूसरा डोस देखील घेतला आहे. तर काहींचा दूसरा डोस घेण्याची वेळ देखील आली आहे. अशा परिस्थितीत ज्यांना कोरोना लसीकरणाचा दूसरा डोस घ्यायचा आहे, त्यांना आता त्यांच्या कोरोना लसीकरणाच्या दूसऱ्या डोसचे वेळापत्रक स्वतःच ठरवायचे आहे.

- Advertisement -

कोरोना लसीकरण मोहीमेस आणखी वेग प्राप्त होण्यासाठी आरोग्य मंत्रालयाकडून एक पाऊल पुढे टाकण्यात येत आहे. अशातच १ एप्रिलपासून देशात कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण सुरू होणार आहे. या टप्प्यांतर्गत ४५ वर्ष आणि त्याहून अधिक वयवर्ष असणाऱ्या नागरिकांना कोरोनाची लस देण्यात येणार आहे. दिलासादायक म्हणजे या टप्प्यातील लसीकरणानंतर पुढील टप्प्यात इतर सामान्य नागरिकांना कोरोनाची लस देण्यात येणार आहे.

 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -