घरमहाराष्ट्रकाँग्रेसचा जाहीरनामा पाकिस्तानची भलामन करणारा - मोदी

काँग्रेसचा जाहीरनामा पाकिस्तानची भलामन करणारा – मोदी

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रात दुसरी सभा गोंदियामध्ये होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सभेच्या भाषणावेळी सर्वांचे आभार मानले. निवडणुकीचा प्रचार मी अनेकदा केला पण अशी गर्दी कधी पाहिली नसल्याचे मोदींनी म्हटले आहे. दरम्यान त्यांनी काँग्रेस- राष्ट्रवादीवर टीका केली आहे. घराणेशाहीला संपुष्टात आणण्याचा विडा उचलला असल्याचे मोदींनी सांगितले आहे. देशाच्या शत्रूंना लोकांनी धडा शिकवण्याचे ठरवले असल्याचे मोदींनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, महायुती महाराष्ट्रातून महामिलावटीला साफ करेल असं मोदींनी सांगितले. घराणेशाहीला उखडून टाकण्याचा जनतेने निर्णय घेतला आहे. देशाच्या विरोधात मवाळ धोरण घेणाऱ्यांना धडा शिकवणार असल्याचे मोदींनी सांगितले आहे.

- Advertisement -

जनतेच्या आशिर्वादामुळे शक्य झाले

मोदींनी पाच वर्षाच्या कार्यकाळात काय कामं केली याचा पाढा वाचून दाखवला आहे. ‘मी मागील पाच वर्षे न थांबता न थकता काम करत राहिलो. गरिबाच्या घरात संडास बनवण्यापासून अवकाशात सॅटेलाईट सोडण्यापर्यत मी पाच वर्षात काम केले’ असल्याचे मोदींनी सांगितले आहे. मात्र ५ वर्षात हे सर्व जनतेच्या आशिर्वादामुळे शक्य झाले आहे. जर तुम्ही तेव्हा आशीर्वाद दिले नसते तर हे शक्य झाले नसते हे मोदींनी स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

काँग्रेसचा जाहीरनामा पाकिस्तानचा भलामन करणारा

काँग्रेसकडून देशाला पुन्हा एकदा अस्थिर करण्याचा कट आहे. यांची सवयी आहे ताबा मिळवायचा नाही तर संभ्रम निर्माण करायचा, अशी टीका मोदींनी काँग्रेसवर केली आहे. काँग्रेस देशात संभ्रामवस्था निर्माण करत आहे. आमची ५ वर्ष यूपीए सरकारच्या चूका सुधारण्यात गेला. दरम्यान, काँग्रेसचा जाहीरनामा पाकिस्तानचा भलामन करणारा असल्याची टीका मोदींनी केली आहे. लोकांनी सावध राहिले पाहिजे. काँग्रेसने देशद्रोहाच्या विरोधातील कायदे हटवण्याचे काम काँग्रेसने केले असल्याची टीका मोदींनी केली आहे. जेव्हा आम्ही सत्तेत आलो तेव्हा तिजोरीत एवढे खड्डे पाहिले जे बुजवायला मला पाच वर्षे लागली असल्याचे त्यांनी सांगितले.

माझ्या कामापेक्षा नावावर चर्चा

चौकीदारला शिव्या देण्याची कामं करत आहे. माझ्या कामापेक्षा नावावर जास्त चर्चा करतात. गोदिंयाचा विकास व्याजासह करणार असल्याचे आवाहन मोदींनी दिले आहे. चौकीदारच्या निष्ठेवर तुमचा विश्वास आहे ना? तुमच्या याच विश्वासामुळे मी ऐवढी काम करत असल्याचे मोदींनी सांगितले. आजकाल दिल्लीमध्ये एसीमध्ये बसलेले नवीन नवीन शब्द शोधत असल्याची टीका मोदींनी केली आहे.

पवारांनी उत्तर दिले पाहिजे

यूपीए सरकारच्या काळात जवान, शेतकरी चिंतेत होते. शहरी नक्षलवादाला काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे. काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे ढकोसपत्र असल्याचे टीका मोदींनी केली आहे. देशद्रोहाचा कायदा सौम्य करण्याच्या काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील मागणीला शरद पवार पाठिंबा देणार का असा सवाल मोदींनी केला आहे. संरक्षण मंत्री झालेल्या शरद पवार यांना हा जाहीर नामा मान्य आहे का असा देखील सवाल त्यांनी केला आहे. शरद पवार का गप्प आहेत. याचे उत्तर शरद पवार यांनी द्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -