घरमहाराष्ट्रवंचित बहुजन आघाडीचाही नागरिकत्व कायद्याला विरोध

वंचित बहुजन आघाडीचाही नागरिकत्व कायद्याला विरोध

Subscribe

नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी कायदा अंतर्गत देशभरात संतापाची लाट पसरली असून याविरोधात आता वंचित आघाडीने देखील आंदोनलाचा एल्गार पुकारला आहे. या आंदेालनाच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय विश्लेषकांच्या देखील भुवया उंचविल्या होत्या. परंतु वंचित बहुजन आघाडीतर्फे 26 डिसेंबरला धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. त्या आंदोलनाची माहिती घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांना निमंत्रण दिल्याने ही भेट झाल्याचे अ‍ॅड. आंबेडकर यांनी स्पष्ट केल्याने मंगळवारी सुरु झालेल्या चर्चेला पूर्णविराम लागले आहे.

वंचित आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी मातोश्रीवर जावून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर हे पहिल्यांदाच मातोश्रीवर गेल्याने अनेकांनी याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात होते. या भेटीत अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यासमवेत आमदार कपिल पाटील, मुंबई विद्यापीठाचे माजी प्रकुलगुरु डॉ. ए.डी.सावंत, मंत्री सुभाष देसाई यांच्यासह अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते. या भेटीनतर पत्रकारांशी बोलताना अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मुख्यमंत्र्यांचा निरोप आल्याने भेटायला आलो.

- Advertisement -

26 डिसेंबर रोजी धरणे आंदोलन होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी शांततेचे आवाहन केले. आमची आंदोलने शांततेतच होतात असे आम्ही त्यांना सांगितल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तर भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषदेबाबत माझ्याकडे असलेली माहिती मुख्यमंत्र्यांनी मागितली आहे. पुढच्या बैठकीत मी त्यांना माझ्याकडे असलेली माहिती देणार आहे, असे अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले. आमचा मोर्चा नाही, तर धरणे आंदोलन आहे. दादरमध्ये 26 डिसेंबर रोजी हे धरणे आंदोलन होईल. डिटेन्शन कॅम्प आहेत, त्याबाबत एक समिती बनवून सविस्तर माहिती द्या, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचे अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले.

तर नागरिकत्व कायदा केवळ मुस्लिमांनाच लागू होत नाही, हा भाजप-संघाचा प्रचार खोटा आहे. या कायद्यामुळे 40 टक्केे हिंदूही भरडले जाणार आहेत. शिवाय अन्य जातींनाही याचा फटका बसणार आहे, त्यामुळेच हे धरणे आंदोलन करण्यात येत आहे, असे अ‍ॅड. आंबेडकर यांनी सांगितले. या कायद्यामुळे मुस्लिम भरडला जाणार आहेच, शिवाय हिंदूमधील 40 टक्के जनता भरडणार आहे. भटके विमुक्त 9-12 टक्के, आलुतेदार-बलुतेदार त्या सगळ्यांकडे कागदपत्रे नाहीत. एनआरसी लागू होईल तेव्हा जन्म कधी झाला याची नोंद नाही. त्यामुळे अशा लोकांना फटका बसेल असे अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -