घरमहाराष्ट्र'नाणार रिफायनरी' विरोधात सेनेचा हल्लाबोल

‘नाणार रिफायनरी’ विरोधात सेनेचा हल्लाबोल

Subscribe

शिवसैनिकांनी राजापूरमध्ये रिफायनरीविरोधात जोरदार घोषणाबाजी केली तसंच रिफायनरी प्रकल्पाची पोस्टरही फाडली

नाणार येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र आणि राज्यातील शासन आग्रही असल्याचे चित्र आहे. अशा स्थितीमध्ये सत्तेतील सहकारी मित्रपक्ष शिवसेनेचे आ. राजन साळवी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने आज रिफायनरीविरोधात हल्लाबोल केला. राजापूर शहरातील एसटी बसस्थानक परिसरामध्ये असलेले रिफायनरीचे समर्थन करणारे बॅनर शिवसेनेने फाडून आणि जाळून टाकले. कोणत्याही स्थितीमध्ये नाणारमध्ये रिफायनरी होऊ देणार नसल्याचा पुन्हा एकदा इशारा दिला. यावेळी आ. साळवींसह मोठ्या संख्येने जमा झालेल्या शिवसैनिकांनी रिफायनरीविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. नाणार येथे होत असलेल्यारी प्रकल्पाला स्थानिकांचा तीव्र विरोध आहे. त्याला शिवसेनेने पाठिंबा दिला असून रिफायनरी रद्द करावी, अशी मागणी शिवसेनेकडून केली जात आहे. त्याबाबत विधानसभेमध्ये शिवसेनेने आपली रिफायनरीबाबतची बाजूही मांडली आहे. मात्र, रिफायनरीबाबतच्या शिवसेनेच्या भूमिकाबाबत प्रकल्पग्रस्तांकडून संशय व्यक्त केला जात आहे.


वाचा : दिल्लीतील शाही लग्नांवर, केजरीवाल ठेवणार नजर

दुस-या बाजूला शिवसेनेसह प्रकल्पग्रस्तांकडून प्रकल्प रद्द करावा, अशी मागणी रेटून धरली जात असताना शासनाकडून मात्र प्रकल्प उभारणीला हिरवा कंदील दिला जात आहे. या सार्याू घडामोडीमध्ये शिवसेनेची चांगलीच कोंडी होताना दिसत आहे. अशा स्थितीमध्ये आ. साळवी यांच्या नेतृत्वाखाली आज शिवसैनिकांनी प्रकल्पाविरोधात जोरदार हल्लाबोल केला. राजापूरमधील एसटी आगाराच्या परिसरामध्ये रिफायनरी समर्थन करणारा फलक लावण्यात आलेला आहे. आ. साळवी यांनी शिवसैनिकांसमवेत हा फलक फाडून त्याची होळी केली. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्य शिवसैनिकांनी रिफायनरीविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत प्रकल्प रद्द झालाच पाहिजे, अशी मागणी केली. रिफायनरीच्या मुद्द्यावर शिवसेना स्थानिकांच्या पाठीशी ठाम असल्याची भूमिकाही आ. साळवी यांनी यावेळी स्पष्ट केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -