घरमहाराष्ट्रशिवाजी महाराज, रामदास स्वामी... राज्यपालांना काही कळतं का?, राज ठाकरे कडाडले

शिवाजी महाराज, रामदास स्वामी… राज्यपालांना काही कळतं का?, राज ठाकरे कडाडले

Subscribe

छत्रपतींनी रामदास स्वामी माझे गुरू होते, असं कधीच सांगितलं नाही. रामदास स्वामींनी छत्रपती महाराज माझे शिष्य होते, असंही सांगितलेलं नाही. नुसती भांडणं लावायची, ज्यातून एकाचं शौर्य कमी करायचं, एकाची विद्वत्ता कमी करायची, असं म्हणत राज ठाकरेंनी राज्यपालांवर निशाणा साधलाय.

पुणेः तुम्हाला काही कळतं का?, शिवाजी महाराज, रामदास स्वामी तुम्हाला काही माहीत आहेत का? आपला काही संबंध नसताना, आपला काही अभ्यास नसताना नुसतं बोलून जायचं, असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारींवर हल्लाबोल केलाय. मनसे आज आपला 16 वा वर्धापनदिन पुण्यात साजरा करत आहे, त्यावेळी ते बोलत होते.

ते परवा आमचे राज्यपाल, काही समज वगैरे काही आहे का? मी पहिल्यांदा भेटायला गेलो तेव्हा बघितलं कसं आहे ते, शेकहँड केल्यावर माझा हात बघायला लागतील, असं वाटलं, आपका मंगल यहा पै है, बुध यहा पै है. तुम्हाला काही कळतं का?, शिवाजी महाराज, रामदास स्वामी तुम्हाला काही माहीत आहे का? आपला काही संबंध नसताना, आपला काही अभ्यास नसताना नुसतं बोलून जायचं. छत्रपतींनी रामदास स्वामी माझे गुरू होते, असं कधीच सांगितलं नाही. रामदास स्वामींनी छत्रपती महाराज माझे शिष्य होते, असंही सांगितलेलं नाही. नुसती भांडणं लावायची, ज्यातून एकाचं शौर्य कमी करायचं, एकाची विद्वत्ता कमी करायची, असं म्हणत राज ठाकरेंनी राज्यपालांवर निशाणा साधलाय.

- Advertisement -

रामदास स्वामींनी शिवछत्रपतींबद्दल लिहिलंय ते मी माझ्या घरात लावलंय. आजपर्यंत छत्रपतींबद्दल इतकं चांगलं लिहिलेलं मी वाचलेलं नाही. श्रीमंत योगी पुस्तक वाचा, पण आमच्याकडे योगी सापडतच नाही. धाड पडली कळतं श्रीमंत आहे. आमच्या लोकांना आणि आमच्याच महापुरुषांना बदनाम करायचं आणि तुमची माथी फिरवून मतं मिळवायची. एवढाच त्यांचा उद्योग सुरू आहे, असंही राज ठाकरे म्हणालेत. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईबद्दल राज्यपाल बोलले. तेव्हा लहानपणी लग्न व्हायची, तुमचं अजून झालं नाही. नको तिथे बोटं घालायची यांना काय सवय आहे. बाकीचे आहेतच आपको क्या लगता है, आपको क्या लगता है. कोंबड्या लागल्या झुंजायला, असाही टोला राज ठाकरेंनी लगावलाय.


हेही वाचाः Maharashtra Corona Update: राज्यात २४ तासांत ३५९ नव्या रुग्णांची वाढ; मार्च महिन्यात तिसऱ्यांदा आज एकही मृत्यूची नोंद नाही

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -