घरताज्या घडामोडीफेरीवाल्यांची हिंमतच ठेचली पाहिजे, लवकरच मस्ती उतरवणार - राज ठाकरे

फेरीवाल्यांची हिंमतच ठेचली पाहिजे, लवकरच मस्ती उतरवणार – राज ठाकरे

Subscribe

ठाणे महापालिकेच्या माजीवडा मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. परप्रांतीय फेरीवाल्यांकडून शासकीय अधिकाऱ्यावर झालेल्या हल्ल्याच्या निमित्ताने राज ठाकरे यांनी घटनेची गंभीर दखल घेतली आहे. भीती काय असते हे त्या फेरीवाल्याला जेलमधून बाहेर आल्यावर दाखवून देणार असल्याचेही राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. फेरीवाल्यांची मस्ती उतरवली पाहिजे अशा शब्दात सज्जड दमच राज ठाकरेंनी यावेळी दिला. एखाद्या शासकीय अधिकाऱ्याची बोट छाटायची फेरीवाल्यांची हिंमतच कशी होते असाही सवाल त्यांनी यावेळी केला. या घटनेच्या निमित्ताने मनसे पुन्हा एकदा परप्रांतीय फेरीवाल्यांच्या मुद्द्यावर लवकरच आक्रमक होण्याची चिन्हे आहेत. या घटनेची प्रतिक्रिया ही लवकरच मनसेकडून येईल असे अपेक्षित आहे. (Raj Thackeray reacted on migrant foothpath vendor attack on government official)

ठाण्यातील अधिकाऱ्यावर हल्ला करणारा फेरीवाला हा पोलिसांकडून ज्यादिवशी सुटणार, त्यादिवशी आमच्याकडून मार खाणार अशा शब्दातच ईशारा राज ठाकरे यांनी यावेळी दिला. फेरीवाल्यांची मस्ती उतरवली पाहिजे, असेही ते म्हणाले. ज्यादिवशी यांचीही बोट छाटली जातील आणि त्यांना फेरीवाला म्हणून फिरता येणार नाही, तेव्हा यांना कळेल. या फेरीवाल्यांची हिंमत कशी होते ? असा सवालही त्यांनी केला. केवळ निषेध करून सुधारणारी ही लोक नाहीत. भीती काय असते हे त्यांना जेलमधून बाहेर आल्यानंतर कळेल असाही ईशारा राज ठाकरे यांनी दिला.

- Advertisement -

फेरीवाल्यांचा माज ही गोष्ट लोकांनीही पाहणे गरजेचे आहे. या फेरीवाल्यांची हिंमत ठेचलीच पाहिजे. महाराष्ट्रातील शासकीय अधिकाऱ्यावर बोट छाटता ? असाही सवाल त्यांनी केला. आज पकडल आहे, उद्या जामीन होईल, पुन्हा हे मोकळे बोट छाटायला असेही राज ठाकरे म्हणाले. सरकार कशासाठी आहे असाही सवाल त्यांनी केला. सरकारने बंधने आणली पाहिजे असेही राज ठाकरे म्हणाले. हा फेरीवाल्यांचा विषय केवळ मुंबईपुरताच नाही असेही त्यांनी सांगितले.


हे ही वाचा – मंदिरे उघडली पाहिजेत, अन्यथा मंदिराबाहेरच घंटानाद करणार – राज ठाकरे

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -