घरमहाराष्ट्रRaj Thackeray : राज ठाकरेंनी सांगितलं झोप किती महत्त्वाची...

Raj Thackeray : राज ठाकरेंनी सांगितलं झोप किती महत्त्वाची…

Subscribe

मोदींना दिलेल्या पाठिंब्यावर भाष्य करतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आरोग्यासाठी झोप किती महत्त्वाची हेही सांगितलं.

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात देशाला चांगल्या खंबीर नेतृत्वाची गरज असून फक्त मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र राज ठाकरेंच्या या भूमिकेनंतर त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केलं गेलं. अशातच आता निवडणुकीच्या अनुषंगाने राज ठाकरे यांची मुलाखत घेण्यात आली. यात त्यांनी मोदींना दिलेल्या पाठिंब्यावर भाष्य करतानाच आरोग्यासाठी झोप किती महत्त्वाची हेही सांगितलं आहे. (Raj Thackeray told how important sleep)

राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषण शैलीसह कडक आणि शिस्तप्रिय स्वभावामुळे राजकारणात स्वत:चं वेगळ स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे त्यांच्याकडे आमदार, खासदार नसताना आणि सत्तेत नसतानाही लोक त्यांना गांभिर्याने घेताना दिसतात. मात्र राज ठाकरे हे नेहमी उशिरा उठतात, अशी टीका त्यांच्यावर होत असते. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राज ठाकरेंच्या उशिरा उठण्यावरून भाष्य केलं होतं. राज ठाकरे यांनी अजित पवारांच्या टीकेला जाहीर सभेतून जोरदार प्रत्युत्तर दिले होते. मात्र सोशल मीडियावर अद्यापही राज ठाकरेंना उशिरा उठण्यावरून ट्रोल केलं जात. याचसर्व पार्श्वभूमीवर आता राज ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. ते सकाळी कितीला उठतात आणि त्यांची दिनचर्या काय असते हे त्यांनी सांगितलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Maratha Reservation : मराठा आरक्षणासंदर्भात राहुल गांधींच्या भूमिकेचं विनोद पाटलांकडून स्वागत

एका मुलाखतीत राज ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला की, तुम्ही कोणालाही सकाळी 8 नंतर बोलावता, त्यामुळे तुमच्याबद्दल गैरसमज आहेत. यावर ते म्हणाले की, मला वाटतं गैरसमज असलेले बरे. पण माझी दिनचर्या तुम्हाला ऐकायची असेल तर, मी साधारपणे 5 वाजता उठतो. आता टेनिस बंद झालं आहे, नाहीतर मी सकाळी 6 वाजता टेनिस खेळायला जायचो. टेनिस पुन्हा सुरू झाल्यावर मी 6 वाजता जाईलच. त्यानंतर साधारण 8, 8.30 किंवा 9 वाजता माझी ओपीडी सुरू होते, ओपीडी म्हणजे लोक मला भेटायला येतात, असे राज ठाकरे यांनी सांगितलं.

- Advertisement -

झोप पूर्ण झाली नाही तर आजारी पडाल (If you don’t get enough sleep, you will get sick)

राज ठाकरे म्हणाले की, पहाटे 5 वाजता मला जाग येतेच, पण असं नाही की मी कधीच उशिरा उठलो नाही. पूर्वी कॉलेजमध्ये असताना मी उशिरा उठायचो. कारण, मला झोप पूर्ण झाली पाहिजे हे निश्चित होतं. त्यामुळे माझा अनेकांना सल्ला आहे की, तुम्ही 8 तास झोपलंच पाहिजे, नाहीतर माणूस आजारी पडेल. अमेरिका आणि युरोपमध्ये स्लीपींग असोसिएशन आहे, ते प्रचार करतात माणसाने जास्तीत जास्त झोपलं पाहिजे, अशी माहितीही राज ठाकरे यांनी दिली.

हेही वाचा –  Patra Chawl Scam : संजय राऊतांकडून स्वप्ना पाटकरचा छळ सुरू; निलम गोऱ्हेंनी वाचून दाखवलं निवेदन

सत्ता नसल्यामुळे मोदींचा विरोध (Opposition to Modi due to lack of power)

महायुतीला दिलेल्या पाठिंब्यावर भाष्य करताना राज ठाकरे यांनी विरोधकांवर निशाणा साधला. ते म्हणाले की, आज जे लोक मोदींचा किंवा भाजपाचा विरोध करत आहेत, त्यांच्यापैकी कुठल्या नेत्याने किंवा पक्षाने माझ्यासारखी भूमिका घेतली नाही. विरोध करणाऱ्यांना सत्तेवरून हाकलवलं आणि  त्यांचे पक्ष फोडले म्हणून ते आज भाजपाच्या विरोधात गेले आहेत. शिवसेना ठाकरे गटाला भाजपाने पहिल्या अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद दिलं असतं, तर ते मोदींविरोधात बोलले असते का? असा सवाल करत यांना काहीतरी हवं होतं म्हणून ते आज मोदींविरोधात बोलत आहेत. पण माझं तसं नाही, असे परखड मत राज ठाकरे यांनी मांडलं.

Edited By – Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -