घरमहाराष्ट्रराणा दाम्पत्याचे कुख्यात युसूफ लकडावाल्याशी आर्थिक संबंध! राऊतांच्या आरोपांची पुन्हा चर्चा

राणा दाम्पत्याचे कुख्यात युसूफ लकडावाल्याशी आर्थिक संबंध! राऊतांच्या आरोपांची पुन्हा चर्चा

Subscribe

शिवसेना खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ प्रकरणी ईडीने सोमवारी अटक केली. यात आता राऊतांनी खासदार नवनीत राणा यांच्यावर केलेल्या आरोपींची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. राणा दाम्पत्याचे कुख्यात युसूफ लकडावाला याच्यासोबत आर्थिक हितसंबंध होते असा आरोप संजय राऊत यांनी तीन महिन्यांपूर्वी केला होता. यात राज्यातील सत्ताबदलानंतर या प्रकरणावर काय कारवाई होणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

लकडावालाचे कुख्यात दाऊद इब्राहिमशी संबंध

राणा दाम्पत्याने लकडावालाकडून 80 लाख रुपयांचे कर्ज घेतल्याचा आरोप राऊतांनी केला होता. मात्र राणा दाम्पत्याने हे आरोप फेटाळले. यावर राऊतांनी हे प्रकरण सुरक्षा आणि आर्थिक अफरातफरीशी निगडित असल्याने राष्ट्रीय तसाप यंत्रणा आणि सक्तवसुली संचालनालय (ईडी) याची चौकशी करणार का? असा सवाल उपस्थित केला होता. नवनीत राणा यांच्या निवडणूक शपथपत्रातील कागदपत्रांच्या आधारे राऊतांनी हे आरोप केले होते. दरम्यान लकडावालाचे कुख्यात दाऊद इब्राहिमसोबत संबंध होते. त्याचा अनेक गुन्हेगारी व दहशतवादी कारवायांमध्ये हात होता, मात्र तुरुंगात असताना त्याचा मृत्यू झाला. यात राणा दाम्पत्याने लकडावालाकडून ही रक्कम कर्ज रुपाने का व कशासाठी घेतली? त्यांचे यासोबत काय संबंध होते? असे सवालही राऊतांनी उपस्थित केले होते.

- Advertisement -

2019 च्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांनी सादर केलेल्या शपथपत्रातील जंगम मालमत्तांच्या तपशीलात गुंतवणुकीविषयीच्या कॉलम क्रमांक ३ मध्ये युसूफ लकडावालाच्या नावासमोर 80 लाख रुपये असा उल्लेख आहे. याच आधारावर संजय राऊतांनी राणा दाम्पत्यावर आरोप केले, युसूफ लकडावालाची ईडी चौकशी झाली तेव्हा त्यांना हे संबंध दिसले नाही का? असा सवालही राऊतांनी केला होता, यानंतर राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले.

 rana couples financial relationship with yusuf lakdawala sanjay raut allegations again in discussion

- Advertisement -

संजय राऊतांच्या आरोपांचे आता काय होणार?

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडून आलेल्या खासदार नवनीत राणा यांनी निवडणुकीचा निकाल लागताच केंद्रातील भाजप सरकारला पाठींबा दिला. आमदार रवी राणा हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक आहेत. यात राणा दाम्पत्याने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला सातत्याने टीका केली. दरम्यान राजकीय लाभ त्यांना मिळू शकेल, अशी राजकीय चर्चा असताना आता संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांचे काय होणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

आमच्यावरील आरोप खोटे, लकडावालाला ओखळतही नाही – रवी राणा

आमच्यावर राऊतांनी केलेले आरोप खोटे आहेत. आम्ही युसूक लकडावाला याला ओळखतही नव्हतो. तो एक बांधकाम व्यावसायिक होता, त्याने बांधलेले गृह प्रकल्पातील एक सदनिका इतर लोकांप्रमाणे आम्ही विकत घेतले. या प्रकरणात पोलिसांनी एसआयटीमार्फत चौकशी केली आणि ही फाईल बंद देखील झाली, संजय राऊतांना पुरावे सादर करता आले नाही, आरोप केल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून तेही काही बोलू शकले नाही, असही आमदार रवी राणा म्हणाले.


हेही वाचा : संजय राऊतप्रकरणी ईडीकडून आणखी दोन ठिकाणी छापे, अनेकांना बजावले समन्स


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -