घरमहाराष्ट्रAnil Parab Dapoli Resort: मोठी बातमी- अनिल परबांचे साई रिसॉर्ट पाडण्यास सुरुवात

Anil Parab Dapoli Resort: मोठी बातमी- अनिल परबांचे साई रिसॉर्ट पाडण्यास सुरुवात

Subscribe

दापोलीतील वादग्रस्त साई रिसॉर्टवर हातोडा मारायला सुरूवात झाली आहे.

रत्नागिरी:दापोलीतील वादग्रस्त साई रिसॉर्ट पाडण्याचे आदेश खेडच्या जिल्हा सत्र न्यायालयाने दिले होते. याच पार्श्वभूमीवर आता या रिसॉर्टवर हातोडा मारायला सुरूवात झाली आहे. ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांच्या मालकीचं हे रिसॉर्ट असल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणी अनिल परब आणि सदानंद कदम यांच्या विरोधात दापोली पोलीस स्टेशन 14 नोव्हेंबर 2022 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. (Ratnagiri Anil Parab Dapoli Resort Demolition of Anil Parab s Sai Resort begins )

दापोलीमधील मुरूड समुद्रकिनाऱ्यावर अनिल परब यांचे साई रिसॉर्ट हॉटेल आहे. याठिकाणई सीआरझेड कायद्याचे उल्लंघन झाल्याचा आरोप भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. हे रिसॉर्ट बांधताना 200 मीटरच्या आत बांधकाम करून सीआरझेड कायद्याचे उल्लंघन केले. समुद्र गिळंकृत केला, असा आरोप सोमय्या यांनी केला.

- Advertisement -

नेमकं प्रकरण काय?

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील मुरूड समुद्रकिनारी असलेल्या वादग्रस्ताच्या शाहीर रिसॉर्ट प्रकरणात माजी परिवहन मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री अनिल परब यांच्यासह आणखी दोघांविरोधात कलम 420 अंतर्गत दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दापोलीच्या गटविकास अधिकारी रुपा दिघे यांनी दिलेल्या जबाबानुसार ही कारवाई केली गेली होती.

- Advertisement -

सोमय्या गेले होते रत्नागिरीत (Anil Parab Depoli Resort)

अनिल परब यांच्या रिसॉर्टवर कारवाई व्हावी, यासाठी किरीट सोमय्या सोमवारी रत्नागिरीत गेले होते. जिल्हाधिकाऱ्यांकडे हा विषय मांडला. तसंच सीआरझे़ड कायदा उल्लंघनाची कारवाई करण्याची मागणी केली. सोमय्या यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेतली होती. यावेळी माध्यमांशी बोलताना सोमय्या म्हणाले होते की, कोणावरही सरसकट कारवाई होणार नाही. मात्र ज्यांचं बांधकाम अनधिकृत आहे. त्यावर नक्की कारवाई होणार.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -