घरताज्या घडामोडीक्रिकेट सामन्यांसाठी आकारण्यात येणाऱ्या 'या' रकमेबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय

क्रिकेट सामन्यांसाठी आकारण्यात येणाऱ्या ‘या’ रकमेबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय

Subscribe

महाराष्ट्रातील विविध भागांत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक क्रिकेट सामने आयोजित केले जातात. या सामन्यात क्रिकेट संघाची लोकप्रियता लक्षात घेऊन सामन्याकरिता आवश्यकतेनुसार राज्याच्या पोलीस प्रशासनातर्फे बंदोबस्त तैनात करण्यात येते. या बंदोबस्तासाठी प्रशासन क्रिकेट सामन्याच्या आयोजकांकडून काही रक्कम आकारली जाते. दरम्यान, पोलीस बंदोबस्तासाठी आकारण्यात येणाऱ्या या रकमेत कपात करण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

राज्याच्या गृह विभागाकडून या संदर्भात निर्णय घेऊन यासंबंधित एक परिपत्रक जाहीर केले आहे. महाराष्ट्रामध्ये मुंबई, नागपूर, पुणे आणि नवी मुंबई येथे क्रिकेटचे सामने आयोजित करण्यात येतात. सदर क्रिकेट सामन्यांमध्ये संघाची लोकप्रियता व स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन सामन्याकरीता आवश्यकतेनुसार विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येतो.

- Advertisement -

विविध कालावधीमध्ये विविध ठिकाणी खेळवण्यात येणाऱ्या क्रिकेट सामन्याकरीता एक एप्रिल 2018 ते 31 मार्च 2019 या कालावधीकरिता सामनानिहाय रोख रक्कम आकारण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे. सदर कालावधी 31 मार्च 2019 रोजी संपुष्टात आला आहे. 2019-20 ते 2023-24 या कालावधीकरिता दरनिश्चितीचा प्रस्ताव शासन मान्यतेसाठी सादर करण्यात आला असता नवीन दर लागू करण्यास सरकारची मान्यता मिळाली आहे.

याआधी मुंबई, नागपूर, पुणे आणि नवी मुंबई याठिकाणी आयोजित करण्यात येणाऱ्या क्रिकेट सामन्यांच्या पोलीस बंदोबस्तासाठी आकारण्यात येणारे शुल्क हे वेगवेगळे होते. परंतु आता या निर्णयानंतर महाराष्ट्रातील सर्व शहरांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या क्रिकेट सामन्यात पोलीस बंदोबस्तासाठी एकच रक्कम आकारण्यात येणार आहे.

- Advertisement -

किती रक्कम आकरण्यात येणार?

मुंबईत टी-20 सामन्यांसाठी 70 लाख रुपयांऐवजी आता फक्त 10 लाख रुपये तर नागपूर, पुणे, नवी मुंबईत टी-20 सामन्यांसाठी 50 लाखांऐवजी आता 10 लाख रुपये आकारण्यात येतील. तसेच कसोटी सामन्यांसाठी 60 लाख रुपयांच्या ऐवजी आता 25 लाख रुपयांचे शुल्क आकारण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे एकदिवसीय सामन्यांसाठी 75 ते 50 लाख रुपयांऐवजी आता 25 लाख रुपये आकारण्यात येणार आहे.


हेही वाचा : World Cup : 1983 ते 2023 भारताच्या ऐतिहासिक विजयाला 40 वर्षे पूर्ण!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -