घरमहाराष्ट्रअमृताताईंना मानसिक आधाराची गरज- रूपाली चाकणकर

अमृताताईंना मानसिक आधाराची गरज- रूपाली चाकणकर

Subscribe

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आडनावावरून टीका केल्यानंतर अमृता फडणवीस यांच्यावर चहूबाजूंनी टीका होत आहे. शिवसैनीकांनी या टिकेचा निषेध म्हणून काल अमृता फडणवीस यांच्याविरोधात जोडेमारो आंदोलन केले. आता राष्ट्रवादी काँग्रेसने या वादात उडी घेतली आहे. गेल्या पाच वर्षामध्ये मुख्यमंत्र्यांची पत्नी म्हणून अमृता फडणवीस यांनी महाराष्ट्रातील जनतेसाठी काय योगदान दिले? असा सवाल राष्ट्रवादी-काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी उपस्थित केला आहे.

- Advertisement -

रूपाली चाकणकर यांनी ट्वीट करत अमृता फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. ‘गेल्या पाच वर्षांत, मुख्यमंत्री पत्नी म्हणून, आपण काय योगदान दिले महाराष्ट्रातील जनतेला,याचं थोडंतरी आत्मपरीक्षण करा आणि तसाही महाराष्ट्रातील जनतेने आपल्याला आणि आपल्या अहंकारी विचारांना नाकारले आहे.त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या आडनावा बद्दल बोलण्याचा अधिकार उरलेला नाही आपल्याला.’ असं म्हणत रूपाली चाकणकर यांनी ट्वीट करत अमृता फडणवीसांवर टीकास्त्र सोडले आहे.

- Advertisement -

तर आणखी एक ट्वीट करत अमृता फडणवीस यांना एक सल्ला दिला आहे. अमृताताईंना आता मानसिक आधाराची गरज आहे. असं त्यांनी आपल्या दुसऱ्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. ‘अमृताताई, खरं तर पराभवामुळे आलेल्या वैफल्यग्रस्त मानसिकतेतुन आता आपण स्वतः सावरून, माजी मुख्यमंत्र्यांना देखील मानसिक आधार द्यायला हवा होता, पण साराचं अंधार दिसतोय आपल्या विचारात.’ असं ट्वीट करत त्यांनी मानसिक आधाराची गरज असल्याचा सल्ला दिला.

अमृता फडणवीसांची बोचरी टीका

माझं आडनाव गांधी आहे, सावरकर नाही या राहुल गांधी यांच्या विधानावरुन हिवाळी अधिवेशन चांगलेच गाजले आणि या हिवाळी अधिवेशनाची सुरुवात देखील याच मुद्द्यावरुन झाली. राहुल गांधींच्या विधानावरुन गेले १५ दिवस वादावादीमध्ये गेले आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा धागा पकडून अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधण्याची संधी साधली.

देवेंद्र फडणवीसांच्या राहुल गांधींबाबतच्या ट्विटवर प्रतिक्रिया देताना अमृता यांनी, ‘खरं आहे देवेंद्र फडणवीसजी…त्याचप्रमाणे केवळ ‘ठाकरे’ आडनाव लावल्यानेही कोणी ठाकरे होत नाही…त्यासाठी सत्यवादी आणि तत्वनिष्ठ असावे लागते… एखाद्याने स्वतःचे कुटुंब आणि सत्तेपेक्षा जनता आणि पक्षातील कार्यकर्त्यांच्या हिताचा विचार करण्याची गरज असते…’,असं ट्विट करत उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -