घरमहाराष्ट्रन्यायव्यवस्थेने बांधलेल्या काळ्या पट्टीला छिद्र, त्यातून आपल्या विचाराच्या लोकांकडे पाहते; राऊतांचं गंभीर...

न्यायव्यवस्थेने बांधलेल्या काळ्या पट्टीला छिद्र, त्यातून आपल्या विचाराच्या लोकांकडे पाहते; राऊतांचं गंभीर वक्तव्य

Subscribe

न्यायव्यवस्थेमध्ये एका विशिष्ट विचारांचे लोक आहेत, त्यांच्याकडून विशिष्ट पक्षाच्या लोकांनाच दिलासा देण्याचे प्रकार सुरू आहेत, हे अतिशय गंभीर आहे, असा गंभीर आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केल्यानंतर अजून गंभीर वक्तव्य त्यांनी केलं आहे. न्यायव्यवस्थेने डोळ्याला पट्टी बांधली असली तरी पण त्या पट्टीला छिद्र पडलं आहे. त्या छिद्रातून ते आपल्या विचाराच्या लोकांकडे पाहतेय, असं गंभीर वक्तव्य संजय राऊत यांनी केलं. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

संजय राऊत म्हणाले, “मी शंभर टक्के म्हणतो हा दिलासा घोटाळाच आहे. तो विशिष्ट राजकीय पक्षाच्या, विशिष्ट विचारसरणीच्या लोकांनाच दिलासा मिळावा यासाठी न्यायव्यवस्थेमध्ये यंत्रणा काम करते. मी आताच भाजपचे महाराष्ट्रातील आमदार देवेंद्र फडणवीस यांचे उजवे हात म्हटलं जाते ते संजय कुटे आहेत, त्यांचं एक वक्तव्य वाचलं. काल ते एका ठिकाणी असं बोलले, ज्या गोष्टी आम्ही पोलिसांकडून, प्रशासनाकडून करुन घेऊ शकत नाही त्या आम्ही न्यायालयाकडून करुन घेऊ शकतो, न्यायालयामध्ये आमचं वजन आहे. आता कोणत्या प्रकारचं वजन आहे,” असा सवाल राऊत यांनी केला.

- Advertisement -

“गेल्या काही काळापासून सतत काही लोकांना दिलासे मिळत आहेत. दिशा सालियन प्रकरणापासून मुंबई बँक प्रकरणापर्यंत…ते आयएनएस विक्रांत निधीचा घोटाळा करणाऱ्या आरोपींपर्यंत हे एका रांगेत सगळ्यांना दिलासे कसे मिळतात? न्यायव्यवस्थेवक कोणाचा दबाव आहे का? दिलासे देण्यासाठी न्यायव्यवस्थेमध्ये विशेष असे कोणी लोकं बसवलं आहे का? आणि ते कोणाच्या सूचनेनुसार काम करतायत का?” असे सवाल राऊत यांनी उपस्थित केले. तसंच, पुढे बोलताना त्यांनी हे असंच सुरु राहिलं तर देशाचं स्वातंत्र्य आणि देशाची लोकशाही आणि न्यायव्यवस्था धोक्यात येईल, अशी भिती राऊत यांनी व्यक्त केली.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -