घरताज्या घडामोडीपोस्टरवॉर : शिवसेनेला उत्तर देण्यासाठी मनसेकडून होर्डिंगबाजीचा प्रयत्न, पोलिसांनी हटवलं होर्डिंग

पोस्टरवॉर : शिवसेनेला उत्तर देण्यासाठी मनसेकडून होर्डिंगबाजीचा प्रयत्न, पोलिसांनी हटवलं होर्डिंग

Subscribe

राज्यातील राजकीय परिस्थिती पाहिली असता सध्या हनुमानच्या नावावरून वाद सुरू आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या दोन जाहीर सभेनंतर या वादाला सुरूवात झाली आहे. काल गुरूवारी शिवसेना भवनच्या बाहेर राज ठाकरेंचे एक पोस्टर लावण्यात आले होते. त्यानंतर आता त्याला प्रतित्युर देण्यासाठी मनसेने देखील आज शिवसेना भवनासमोर होर्डिंगबाजी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोस्टर लावण्याआधीच पोलिसांनी हे पोस्टर हटवलं. त्यामुळे आता शिवसेना आणि मनसेचा पोस्टरबाजीचा नवा अंक सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे.

शिवसेना भवनसमोर काल काही अज्ञात व्यक्तिंनी राज ठाकरेंचं छायाचित्र असलेलं पोस्टर लावलं होतं. त्यामध्ये राज ठाकरेंची बदलती भूमिका दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. यामध्ये काल, आज आणि उद्या? असे म्हणत राज ठाकरेंचा फोटो लावण्यात आला आहे. मात्र, या पोस्टरवरून आक्रमक झालेल्या मनसैनिकांनी स्वत: पोस्टर तयार करुन शिवसेना भवनाबाहेर लावण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला आहे. तसेच पोलिसांनी मनसेचा पोस्टर ताब्यात घेतला.

- Advertisement -

मनसेने जारी केलेल्या पोस्टरमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा फोटो दर्शवण्यात आला आहे. काल, आज आणि उद्या? असे म्हणत मनसेने पोस्टरमध्ये उद्धव ठाकरेंचे दोन फोटो टाकले आहे. मुख्यमंत्र्यांची बदलती भुमिका पाहता आपण ही पोस्टरबाजी केल्याचे मनसेचे म्हणणे आहे. त्यामुळे आता सेना आणि मनसेचा वाद पुन्हा एकदा चिघळताना पाहायला मिळत आहे.


हेही वाचा : वाढलेली महागाई, इंधन दरवाढ भोंग्यातून सांगा; आदित्य ठाकरेंचा राज ठाकरेंना टोला

- Advertisement -

 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -