घरमहाराष्ट्रइर्शाळवाडीत प्रशासनाकडून कलम 144 लागू, उपविभागीय अधिकाऱ्यांचा निर्णय

इर्शाळवाडीत प्रशासनाकडून कलम 144 लागू, उपविभागीय अधिकाऱ्यांचा निर्णय

Subscribe

इर्शाळवाडीमध्ये स्थानिक प्रशासनाकडून कलम 144 लागू करण्यात आले आहे. आजपासून पुढील 15 दिवसांसाठी हे कलम लागू करण्यात आले आहे. कर्जतचे उपविभागीय अधिकारी अजित नैराळे यांनी शनिवारी हे विशेष आदेश लागू केले आहेत.

रायगड : खालापूर तालुक्यातील इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडीवर बुधवारी (ता. 19 जुलै) दरड कोसळली. रात्री कोसळणाऱ्या पावसामध्ये ही भीषण दुर्घटना झाल्याने या घटनेत वाडीतील 17 घरे जमीनदोस्त झाली असून गेल्या तीन दिवसांत 27 जणांचे मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले आहेत. सततच्या पावसामुळे मदत कार्यात अडथळे येत असून NDRF, TDRF तसेच इतर संस्थांच्या बचाव कर्मचाऱ्यांच्या मार्फत या ठिकाणी मदतकार्य राबविण्यात येत आहे. पण आता इर्शाळवाडीमध्ये स्थानिक प्रशासनाकडून कलम 144 लागू करण्यात आले आहे. आजपासून पुढील 15 दिवसांसाठी हे कलम लागू करण्यात आले आहे. (Section 144 enforced in Irshalwadi by sub-divisional officers)

हेही वाचा – इर्शाळवाडी घटनेनंतर त्र्यंबकेश्वरच्या सुफली, मेटघरच्या दहा पाड्यांच्या पुनर्वसनासाठी हालचाली

- Advertisement -

सदर घटना ही डोंगरावर घडलेली असल्याने या ठिकाणी जाण्यायेण्यासाठी कोणत्याही साधनाचा उपयोग करणे अशक्य आहे. ज्यामुळे बचाव पथकातील सदस्यांना सतत वर-खाली ये-जा करावी लागत आहे. ज्यामुळे डोंगरावरील पायवाट सुद्धा निसरडी झाली आहे. तर काही उत्साही लोक देखील इर्शाळगडावर जाण्याच्या निमित्ताने घटनास्थळी येत आहे. ज्यामुळे मानवी हस्तक्षेपामुळे सुद्धा बचावकार्य करण्यात अडथळा येत आहे. त्यामुळे आता प्रशासनाने कठोर पावले उतलत कलम 144 लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

मदतीसाठी आवश्यक यंत्रणा उभी केली असून गडावर गर्दी करू नका, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले होते. परंतु तरी देखील गडावर गर्दी होत असल्यामुळे पुढील 15 दिवसांसाठी जमावबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मदतकार्यात नेमलेल्या व्यक्ती, संस्थां व्यतिरिक्त इतर कोणालाही आता गडावर जाता येणार नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. यासाठी चौक मानवली गावाच्या हद्दीवर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून गावात प्रवेश करणाऱ्यांची चौकशी करण्यात येत आहे. तसेच, 144 प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश देखील लागू करण्यात आले आहेत. कर्जतचे उपविभागीय अधिकारी अजित नैराळे यांनी शनिवारी हे विशेष आदेश लागू केले आहेत. 23 जुलै ते 6 ऑगस्टपर्यंत हे आदेश लागू असणार आहेत. तर आणखी आठ दिवस हे बचावकार्य सुरू राहणार असल्याचे देखील सांगण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -