घरमहाराष्ट्रलहान मुलांच्या लठ्ठपणासाठी टास्क फोर्सची स्थापना

लहान मुलांच्या लठ्ठपणासाठी टास्क फोर्सची स्थापना

Subscribe

सध्या लहान मुलांमध्ये लठ्ठपणांचं प्रमाण वाढलेले पाहयला मिळत आहे. ते वाढते प्रमाण लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने लठ्ठपणाबाबत 'टास्क फोर्स'ची स्थापन केली आहे.

लहान मुलांमध्ये वाढणारं लठ्ठपणांचं प्रमाण पाहता महाराष्ट्र सरकारने लठ्ठपणाबाबत ‘टास्क फोर्स’ची स्थापन केली आहे. या टास्क फोर्सद्वारे खासकरून लहान मुलांमधील लठ्ठपणावर शासन पातळीवर त्वरित कार्यवाही करण्यात येणार आहे. लठ्ठपणामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. काहीवेळा लठ्ठ माणूस चेष्टेचा विषय ठरतो, त्याला त्याचा कमीपणा वाटतो. शहरी भागात मधूमेह, हृदयविकार, रक्तदाब हे आजार वाढत आहेत. याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. लठ्ठपणा हे आरोग्य क्षेत्रापुढील गंभीर आव्हान असल्याचं मत राज्यपाल विद्यासागर राव यांनी व्यक्त केलं आहे.

राज्यात मेटाबॉलिक इन्स्टिट्यूट सुरु करणार

‘जागतिक लठ्ठपणा’ दिवसाच्या निमित्ताने डॉ. जयश्री तोडकर आणि पत्रकार संतोष शेनॉय यांचे ‘ओबीसिटी मंत्र’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या प्रकाशना दरम्यान बोलताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “हे पुस्तक सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी महत्त्वाचं आहे. लठ्ठपणा हा आजार आहे हे आपल्याला माहिती नव्हतं. मात्र याबाबत जनजागृती सुरु करणे गरजेचे असून त्यासोबतच टास्क फोर्स स्थापन करून विशेषत: चाईल्ड ओबेसिटीवर शासन पातळीवर त्वरित कार्यवाही करण्यात येणारे. शिवाय मेटाबॉलिक इन्स्टिट्यूट सुरु करण्यासाठी सरकार पुढाकार घेणार आहेत.

- Advertisement -

तसेच, मोठ मोठ्या हॉटेलमध्ये आता मेनूकार्डवर कॅलरी यायला हव्यात. त्यातून काय खावे हे समजेल. जंक फूडबाबतही समाजात जागृती होण्यासाठी शासनस्तरावर कारवाई करण्यात येईल, असे ही या पुस्तकात नमुद करण्यात आलं असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं आहे.

लहान मुलं लठ्ठ असण्याचे प्रमाण अधिक

भारतात लहान मुलं लठ्ठ असण्याचं प्रमाण वेगाने वाढत आहे. सर्वाधिक लठ्ठ मुलं असलेल्या देशांमध्ये चीननंतर भारताचा दुसरा क्रमांक लागतो. आकडेवारीनुसार, देशात १४.४ दशलक्ष मुलांचं वजन प्रमाणापेक्षा जास्त आहे. जगात सुमारे २ अब्ज लहान मुलांना जास्त वजन किंवा लठ्ठपणामुळे आजार बळावत आहेत. सध्या १० पैकी ६ किशोरवयीन मुलं लठ्ठपणाने ग्रस्त आहेत.

- Advertisement -

लहान मुलांमधील लठ्ठपणा रोखण्यासाठी काही पद्धती

सकाळचा नाश्ता टाळू नका

सकाळच्या नाश्त्यामध्ये मुलांना चांगल्या प्रमाणात प्रथिनं मिळणं गरजेचं आहे. यामध्ये अंड्याचा पांढरा भाग, दही, चिकन, लो फॅट चीज यांच्यासोबत फायबर असलेल्या पदार्थांचा वापर करावा. एका अभ्यासक्रमानुसार असं आढळून आलंय की, सकाळचा नाश्ता टाळल्यास शरीरातील फॅट्स वाढण्यास मदत होते.

स्नॅक्ससाठी फळांचा वापर करा

२-३ फळांचा वापर तुम्ही स्नॅक्ससाठी करू शकता. ज्या फळांमध्ये अँटीऑक्सिडंटचे प्रमाण अधिक असते अशा फळांचा शक्यतो वापर करावा. जसं की पेरू, सफरचंद, डाळिंब इत्यादी.

फॅट वाढवणाऱे पदार्थ टाळा

खारी, बिस्किटं, नान, पाव, रूमाली रोटी, बर्गर, पिझ्झा, पेस्ट्री असे पदार्थ खाणे शक्यतो टाळावे. कधीतरी या पदार्थांचे सेवन तुम्ही करू शकता. अभ्यासानुसार असं समजलंय की, अधिक फॅट असलेले पदार्थ खाल्ल्याने मुलांच्या शरीरातील फॅट्स वाढतात.

शीतपेयांचं सेवन टाळा

शीतपेयांचं सेवऩ शक्यतो टाळावं. त्याऐवजी ताक, नारळपाणी, आवळ्याचा रस, फ्रेश लाईम सोडा यांचा वापर तुम्ही करू शकता.

भाज्यांचा आहारात समावेश करा

पालेभाज्या, इतर भाज्या आणि कडधान्य यांचा वापर आहारात जरूर करावा. भाज्यांचं सलाड खाण्याने पोटातील चरबी कमी होण्यास मदत होते. मात्र भाज्यांच्या स्वच्छतेची काळजी घ्या.

भरपूर पाणी प्या

दररोज भरपूर प्रमाणात पाणी प्यावे. दिवसाला १२ ग्लास तरी पाणी पिणे गरजेचे आहे.

आपला देश हा २९ वर्षांखालील तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. लठ्ठपणा आणि बदलती जीवनशैली यांच्याशी संबंधित विकारामुळे युवा वर्गाचे फार मोठं नुकसान होईल. त्यांच्यात जागृती निर्माण करणं गरजेचं आहे. जागतिक आकडेवारीनुसार, ३९ टक्के प्रौढ व्यक्ती अतिरिक्त वजनाच्या असून यातील १३ टक्के लोक लठ्ठपणाशी झुंज देत आहेत. यामुळे सक्तीने प्रत्येक शाळांमध्ये शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीला वैद्यकीय शिबीर आयोजित करून मुलांमध्ये लठ्ठपणा आणि योग्य आहार याबाबत जागृती करावी. यासोबत मोफत दंत चिकित्सा शिबीराचे आयोजनही करावे. शिवाय, लठ्ठपणाबाबत टास्क फोर्स स्थापन केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देखील दिल्या आहेत. शिवाय याचा नियमितपणे आढावा घेण्याबाबत सूचित केले.  – विद्यासागर राव, राज्यपाल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -