घरताज्या घडामोडीBipin Rawat Helicopter Crash: शरद पवारांनी पायलटला दिलेल्या सल्ल्याने हेलिकॉप्टर अपघातातून बचावले...

Bipin Rawat Helicopter Crash: शरद पवारांनी पायलटला दिलेल्या सल्ल्याने हेलिकॉप्टर अपघातातून बचावले होते, सांगितला किस्सा

Subscribe

तामिळनाडूत संरक्षण दलाच्या हेलिकॉप्टरला झालेल्या भीषण अपघातात संरक्षण दल प्रमुख जनरल बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नीचं निधन झालं आहे. या हेलिकॉप्टरमध्ये एकूण १४ जणं होते. परंतु त्यामधील १३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ग्रूप कॅप्टन वरूण सिंह हे अपघातात जखमी झाले आहेत. तसेच त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बिपीन रावत यांच्या निधनानंतर देशभरातून दुःख व्यक्त केले जात आहे. आज त्यांचं पार्थिव दिल्लीत आणणार असून उद्या (शुक्रवार ) त्यांच्यावर अंतिम अंत्यसंस्कार होणार आहेत. या दुर्घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ही घटना अतिशय धक्कादायक आणि दु:खदायक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यावेळी पवारांनी त्यांच्या हेलिकॉप्टरचा एक थरारक अनुभव सांगितला आहे.

शरद पवारांनी एक व्यक्तिगत अनुभव सांगितला आहे. मी पुण्याहून मुंबईला हेलिकॉप्टरने जात होतो. तेव्हा मी, माझी पत्नी आणि राज्यमंत्री माझ्यासोबत होते. परंतु खोपोलीकडे जात असताना एक व्हॅली आहे. तिथे अनेकदा ढगाळ वातावरण असतं. आसपास उंचच उंच डोंगर आहेत. प्रवासा दरम्यान सोसाट्याचा वारा आला होता. त्यामुळे ते हेलिकॉप्टर पुढे जायला मर्यादा आल्या. ढग मोठ्या प्रमाणात असल्यामुळे हवेचा दाबही वाढत होता. आजूबाजूला काय आहे हेही दिसत नव्हतं. अशा परिस्थितीत हेलिकॉप्टर पायलट सुद्धा काहीसा गडबडला होता. कारण हेलिकॉप्टरमधून पुढचे काहीस दिसत नव्हते. मात्र, काही क्षणातचं पवार यांच्या एक गोष्टी लक्षात आली. आजूबाजूला मोठ-मोठे आणि उंचच -उंच डोंगर आहेत. त्यामुळे हेलिकॉप्टर आदळलं तर हा शेवटच आहे. असं पवारांना वाटले.

- Advertisement -

परंतु शरद पवारांना संपूर्ण महाराष्ट्राची माहिती असल्यामुळे त्यांनी सांगितले की, महारष्ट्रात कळसूबाई हे सर्वात उंच शिखर असून त्याची उंची ५ हजार फूटांच्या वर नाहीये. त्यावेळी पवारांनी पायलटला सल्ला दिला की, आपण ७ हजार फूट उंचीवर गेलो तर काही अडथळा येणार नाही. तसेच हेलिकॉप्टर धडकण्याची शक्यता नाही. त्यामुळे ढगांचा अडथळा पार करत आम्ही हेलिकॉप्टर अपघातातून सुखरूप बचावलो आणि उतरू शकलो. असं शरद पवारांनी सांगितलं.

- Advertisement -

सीडीएस जनरल बिपीन रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका रावत यांचे पार्थिव आज (गुरूवार) दिल्लीत आणले जाणार आहे. तसेच उद्या दिल्लीतील कॅन्टोन्मेंटमध्ये दोघांवर अंतिम अंत्यसंस्कार केले जाणार आहे. रावत यांचे पार्थिव दर्शनासाठी पाठवले जाईल आणि सकाळी ११ ते दुपारी २ वाजेदरम्यान त्याच्या पार्थिवाला सलामी दिली जाणार आहे.


हेही वाचा: CDS Bipin Rawat Death : सीडीएस बिपीन रावत यांच्या पार्थिवावर शुक्रवारी अंत्यसंस्कार, आज दिल्लीत पार्थिव होणार दाखल


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -