घरक्राइमबेपत्ता झाल्याने 'सोशल मीडिया'वर व्हायरल झालेली 'ती' तरुणी सापडली; प्रियकरासाठी गेली होती...

बेपत्ता झाल्याने ‘सोशल मीडिया’वर व्हायरल झालेली ‘ती’ तरुणी सापडली; प्रियकरासाठी गेली होती पळून

Subscribe

नाशिक : मुंबई नाका बसस्थानकातून बेपत्ता झालेली तरुणी सोलापुरात असल्याचे समोर आले आहे. तिने प्रियकरासोबत लग्न केल्याचेही पोलीस तपासात उघडकीस आले आहे. ती बेपत्ता झाल्यापासून तिच्या फोटोसह पोस्ट व्हायरल झाली होती. अश्विनी देविदास सोनवणे (वय 27 वर्ष, रा. मखमलाबाद, नाशिक) असे तरुणीचे नाव आहे.

अश्विनी गुरुवारी (दि.१५) मुंबई नाका बसस्थानकात आली होती. तिला मुलाखतीसाठी मुंबईला जायचे होते. मात्र, ती मुंबईला गेली नाही. ती बेपत्ता झाल्याने तिच्या कुटुंबियांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी तिचा शोध सुरु केला. त्यानंतर तिचे फोटो व त्या संबंधित माहिती सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली होती. पोलीस तपासात ती रविवारी सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते येथे असल्याचे समोर आले. शिवाय, तिने प्रियकरासोबत लग्न केल्याचेसुद्धा उघडकीस आले. हे प्रकरण मुंबई पोलीस स्थानकात दाखल झाल्यावर मुंबई नाका पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली. ती रविवारी (दि.१८) सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते पोलीस ठाणेहद्दीत सुखरूप आढळून आली. तिने प्रियकरासोबत लग्न केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

- Advertisement -
सोशल मीडियावर वेगळीच चर्चा 

दरम्यान, ही मुलगी बेपत्ता झाल्यानंतर तिच्या शोधासाठी सोशल मीडियाचा आधार घेण्यात आला. लागलीच कायम सतर्क राहणाऱ्या अनेक नेटकऱ्यांनी ती बेपत्ता झाल्याच्या किंवा तीच अपहरण झाल्याच्या पोस्ट टाकल्या. यावेळी सध्या समाजात गाजत असलेल्या लव्ह जिहाद पासून ते तस्करी पर्यंत अश्या अनेक प्रकारच्या शंका ही उपस्थित करण्यात आल्या. मात्र, ती तरुणी स्वताच्या मर्जीनेच आपल्या प्रियकरला भेटण्यासाठी गेली असे जेव्हा समजले. तेव्हा मात्र, नेटकऱ्यांचा संतापही बघायला मिळाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -