घरताज्या घडामोडीShiv Chhatrapati Award : शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर, क्रीडामंत्र्यांकडून घोषणा

Shiv Chhatrapati Award : शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर, क्रीडामंत्र्यांकडून घोषणा

Subscribe

राज्य सरकारकडून क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला आहे. राज्य शासनाकडून दिला जाणारा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार शुक्रवारी जाहीर करण्यात आला आहे. क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषद घेवून क्रीडा पुरस्काराची नावे जाहीर केली आहेत.

सन 2019-20 मधील क्रीडा पुरस्कार ठाण्यातील श्रीकांत शरदचंद्र वाड यांना देण्यात आला आहे. तर 2021-22 मधील जीवन गौरव पुरस्कार मुंबईचे आदिल जहांगीर सुमारीवाला यांना जाहीर करण्यात आला आहे. तसेच साताऱ्याच्या स्नेहल विष्णू मांढरे हिला राज्य शासनाने शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर केला आहे. त्याचप्रमाणे आर्चरी खेळात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्नेहलला सन 2019-20 या कालावधीतील पुरस्कार जाहीर झाला आहे.

- Advertisement -

तीन वर्षांचे क्रीडा पुरस्कार

राज्यातील क्रीडा महर्षी, मार्गदर्शक, खेळाडू यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देण्यात येतो. राज्य सरकारने आज गेल्या तीन वर्षांचे क्रीडा पुरस्कार जाहीर केले आहेत. सन 2019-20चा शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार ठाण्याचे श्रीकांत शरदचंद्र वाड यांना, तर 2021-22 चा जीवन गौरव पुरस्कार मुंबईचे आदिल जहांगिर सुमारीवाला यांना जाहीर करण्यात आला आहे. तीन वर्षांतील एकूण 116 पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

- Advertisement -

राज्यात क्रीडा संस्कृतिचा वारसा जपला जाऊन त्याचे संवर्धन व्हावे, क्रीडा क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या क्रीडा महर्षी, मार्गदर्शक, खेळाडू, यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देण्यात येतात, असं क्रीडा मंत्री गिरीश महाजन म्हणाले.


हेही वाचा : NCP NOTICE : राष्ट्रवादीची 12 आमदारांना कारणे दाखवा नोटीस, शरद पवार Action मोडवर


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -