घरमहाराष्ट्रउद्धव ठाकरेंनी घेतली राज्यपालांची भेट; बाहेर येऊन केले राज्यपालांनी स्वागत

उद्धव ठाकरेंनी घेतली राज्यपालांची भेट; बाहेर येऊन केले राज्यपालांनी स्वागत

Subscribe

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राजभवनावर जाऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राजभवनावर जाऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली आहे. विशेष म्हणजे राज्यपाल यांनी स्वत:हा बाहेर येऊन उद्धव ठाकरेंचे स्वागत केले आहे. यावेळी त्यांच्यासोबत उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे देखील यावेळी उपस्थित होत्या. उद्या, गुरुवारी संध्याकाळी उद्धव ठाकरे शिवाजीपार्क येथील शिवतीर्थावर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. तसेच विधीमंडळ राजकारणात उद्धव ठाकरेंचे आजचे हे पहिले पाऊल आहे.

- Advertisement -

 

उद्या घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

राज्यातील सत्ता स्थापनेचा अखेर मंगळवारी तिढा सुटला. सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्याने आता राज्यात शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आपले बहुमत सिद्ध करत ‘महाविकास’आघाडीची सत्ता स्थापन करणार आहेत. या पार्श्वभूमीवर आज राज्यातील नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडत असून आघाडीच्या नेतेपदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची निवड करण्यात येत असल्याचे पक्षांच्या ,संयुक्त बैठकीत जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे हे नवे मुख्यमंत्री होणार असून गुरुवारी संध्याकाळी ६.४० मिनिटांने उद्धव ठाकरे शिवाजीपार्क येथे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.

- Advertisement -

वांद्रे – कुर्ला संकुलातील ट्रायडेंट हॉटेलमध्ये मंगळवारी शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस या तीन पक्षांच्या महाराष्ट्र विकास आघाडी म्हणजेच महाविकास आघाडीच्या आमदारांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीत महाविकास आघाडीचे नेते आणि मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची निवड राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सूचनेनुसार करण्यात आली आहे. तसेच 0राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव सुचवणारा ठराव मांडला, तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी त्यास अनुमोदन दिले. या नव्या आघाडीबद्दल उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्यासह सोनिया गांधींचे आभार मानले. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही मार्गदर्शन केले. या बैठकीनंतर तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी राजभवनवर जाऊन सत्तास्थापनेचा दावा केला आहे. त्यानुसार, आज सर्व नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडत आहे.


हेही वाचा – आगे आगे देखो होता है क्या – सुप्रिया सुळे


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -