घरमहाराष्ट्रकेंद्रीय तपास यंत्रणांकडून आव्हान द्यायचं आणि पोलिसांच्या मागे लपायचं, असं चालणार नाही-...

केंद्रीय तपास यंत्रणांकडून आव्हान द्यायचं आणि पोलिसांच्या मागे लपायचं, असं चालणार नाही- मुख्यमंत्री

Subscribe

केंद्रीय तपास यंत्रणांकडून आव्हान द्यायचं आणि पोलिसांच्या मागे लपायचं याला नामर्द म्हणतात. हे मर्दाचे लक्षण नाही आणि हिंदूत्वाचे नाहीचं नाही. अजिबात नाही. असं विधान करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपावर टीकेची तोफ टागली आहे. शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात आज शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री या नात्याने उद्धव ठाकरे बोलत आहे. यावेळी त्यांनी केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून विरोधी पक्षनेत्याविरोधात सुरु असलेल्या कारवाईवरून भाजपावर सडकून टीका केली आहे.

यावेळी बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले की, “अंगावर आल्यानंतर शिंगावर घेण्याची भाषा करणार असाल तर स्वत:मध्ये हिंमत आणि धमक असेल तर आणि तर द्या. ईडी, सीबीआय, इनकम टॅक्सच्या माध्यमातून देऊ नका. मी सुद्धा पक्षप्रमुख आव्हान द्याचे झाल्यास तर माझ्या मर्द शिवसैनिकांच्या माध्यमातून आणि त्याच्या ताकदीतून देईन. मुख्यमंत्री म्हणून देणार नाही.”

- Advertisement -

“ही काय लायकीची माणसं आणि ही आपल्या अंगावर येतायत? आपल्याला आव्हान देतायतं हिंमत असेल तर अंगावर या आम्ही कोणाच्या अंगावर जात नाही. पण कोणी आलं तर आम्ही सोडत नाही. आम्ही कशाला येऊ तुमच्या अंगावर.. काय आहे तसं? लायकी तरी आहे का? पात्रता तरी आहे का? पण हीच शिकवण आम्हीला शिवरायांनी आणि शिवसेना प्रमुखांनी दिलेली आहे हे विसरु नका.” असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी अप्रत्यक्षरित्या भाजपावर टीका केली आहे.

“भाजपात गेलेली भाजपाची ब्रँड अँम्बेसिडर झाली पाहिजेत”

एक परवा बोलले आहेत हर्षवर्धन पाटील. की भाजपा. मी म्हणजे ते भाजपामध्ये जाणार… मी तर कधी शक्यच नाही.. अजिबात नाही. माझं जे काही आहे तेच माझं घर आहे. हर्षवर्धन पाटील अनाऊतपणे बोलून गेले की, भाजपत का गेलो?… खरं म्हणजे मला अस वाटत अशी जी काही लोक आहेत जी भाजपात गेली आहेत ती भाजपाची ब्रँड अँम्बेसिडर झाली पाहिजेत. असही टीका मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

- Advertisement -

“भाजपा मे जाने का बाद कुंभकरण जैसी निंद सो सकता हूँ”

हल्ली टीव्हीवर जाहिराती येतात. हल्ली टीव्ही बघायला वेळ नाही मिळत. येतात की नाही तशा जाहीराती आता.. एक कोण तरी गोरा माणूस दाखवतात आणि मग त्याचा तोंडात हिंदी डब करुन टाकतात. पहिले तो मुझे निंद की गोली खाकर भी निंद नही आती थी…दरवाजे पर टकटक होती थी तो रोंगते खडे हो जाते थे….. फिर किसने कहा तूम भाजपा में जाओ…. अब भाजपामे जाने का बाद कुंभकरण जैसी निंद सो सकता हू… दरवाजे पर ठोका तो भी उटता नही हूँ…. असंही टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -