घरमहाराष्ट्रधक्कादायक : दोन शिक्षकांकडून चार विद्यार्थिनींचे लैगिक शोषण; अकोला जि.प. शाळेतील प्रकार

धक्कादायक : दोन शिक्षकांकडून चार विद्यार्थिनींचे लैगिक शोषण; अकोला जि.प. शाळेतील प्रकार

Subscribe

अकोला : शिक्षकांना गुरूचे स्थान देऊन त्यांना आई-वडलांच्या जागी ठेवले जाते. मात्र आपल्या देशातील काही शिक्षकच गुरू या शब्दाला काळीमा फासत आहेत. अकोला जिल्ह्यातील धामणदारी येथे जिल्हा परिषदेच्या शाळेतील दोन शिक्षकांनी चौथ्या वर्गात शिकणाऱ्या 4 विद्यार्थिंनीवर शाळेतील शिक्षकांनीच लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यात धामणदारी इथे जिल्हा परिषद शाळेत शिकवणाऱ्या सुधाकर ढगे आणि राजेश तायडे अशी या दोन शिक्षकांची नावे आहेत. शिक्षकी पेशाला काळीमा फासणारे कृत्य ४ एप्रिलला उघडकीस आले. या प्रकरणात त्यांच्यावर बार्शीटाकळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या प्रकरणी परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

- Advertisement -

मुली घरी थांबायला लागल्याने प्रकरा आला समोर
चौथ्या वर्गात शिकणाऱ्या ४ विद्यार्थिनींवर त्यांच्याच शाळेतील दोन शिक्षक वारंवार अश्लील चाळे करत होते. दोन्ही शिक्षक मुलींना एकटे गाठून आपले कुकर्म साधत होते. वारंवार घडणाऱ्या या कृत्यामुळे अल्पवयीन मुली भयभीत झाल्या होत्या आणि त्यांनी जास्त वेळ घरी थांबण्यास सुरूवात केली.
पीडित मुलींपैकी एकही मुलगी शाळेत जात नसल्यामुळे पालकांनी त्यांना शाळेत न जाण्याचे कारण विचारले. या चौघींपैकी एकीने वारंवार घडत असलेला प्रकार आपल्या आईला सांगितला. सदर प्रकार ऐकल्यानंतर कुटुंबींयांना मोठा धक्का बसला. त्यानंतर कुटुंबाने बार्शीटाकळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार संजय सोळंके यांच्यासमोर सर्व घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिसांनी राजेश रामभाऊ तायडे (वय ४५) आणि सुधाकर रामदास ढगे (वय ५३) या दोन्ही शिक्षकांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या सर्व प्रकारामुळे पालक आपल्या मुलींना पाठवायला घाबरत आहेत.

अश्लिल चाळे करून मुलींना द्यायचे धमकी
अकोल्यातील धामणदारी या गावात जिल्हा परिषदेची छोटी शाळा आहे. या शाळेतील दोन्ही शिक्षक अकोला येथून ये-जा करतात. चौथ्या वर्गात शिकणाऱ्या हजर असलेल्या मुलींना एकट्यात बोलावून अश्लील चाळे करायच्या आणि कोणालाही सांगू नका अशी धमकीही द्यायच्या. मात्र एका मुलीने आपल्या आईला सदर घटना सांगितल्यावर पालकांनी आणि गावातील नागरिकांनी बार्शीटाकळी पोलीस स्टेशन गाठले.
दरम्यान, इथे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मुले व मुली मिळून फक्त ९ पटसंख्या आहे. या विद्यार्थ्यांना शिक्षकवण्यासाठी सुधाकर ढ़गे आणि राजेश तायडे हे दोन शिक्षक कार्यरत होते. मात्र ते दोघेही दररोज शालेयमध्ये हजर नसायचे. दोघांनी एक-एक दिवस ठरवला होता. शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होती. त्यातही काही विद्यार्थी गैरहजर राहिल्यावर उपस्थित असलेल्या काही मुलींना एकटे पाहून हे दोन्ही शिक्षक त्यांच्यासोबत अश्लील चाळे करायचे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -