घरताज्या घडामोडी'भाजपा' हे नाव समृद्धीचे... पक्षाच्या स्थापनादिनी देवेंद्र फडणवीसांनी मांडलं मत

‘भाजपा’ हे नाव समृद्धीचे… पक्षाच्या स्थापनादिनी देवेंद्र फडणवीसांनी मांडलं मत

Subscribe

सायन : भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आणि भाजपचे विधान परिषद प्रतोद आमदार प्रसाद लाड यांच्या, सायन सर्कल येथील जनसंपर्क कार्यालयात भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते.

राष्ट्र प्रथम, नंतर पार्टी, शेवटी स्वतः, अशी कार्यकर्त्यांना शिकवण देणाऱ्या भाजपच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने सायन सर्कल येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी त्यांच्या हस्ते भाजपचा ध्वज फडकविण्यात आला. ‘भाजपा’ हे नाव समृध्दीचे आणि विश्वासाचे असल्याचे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थापना दिनाच्या निमित्ताने व्यक्त केले आहे. तसेच त्यांनी यावेळी सर्व कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना स्थापना दिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

- Advertisement -

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नारळ वाढवून, दोन रुग्णवाहिकांचे लोकार्पण देखील करण्यात आले. आमदार प्रसाद लाड यांच्या पुढाकाराने सामाजिक क्षेत्रात विविध उपक्रम राबविले जातात. मी मुंबई अभियान अभिमान प्रतिष्ठान अंतर्गत सुरु असलेल्या चालता फिरता दवाखानाच्या ताफ्यात या रुग्णवाहिकांची भर पडणार असून, या रुग्णवाहिका गरजू रुग्णांना अविरत सेवा देणार असल्याचे मत यावेळी आमदार प्रसाद लाड यांनी व्यक्त केले आहे.

याप्रसंगी भाजप नेते पवन त्रिपाठी भाजप जिल्हाध्यक्ष राजेश शिरवाडकर, माजी नगरसेविका राजेश्री शिरवाडकर, माजी नगरसेविका तसेच नेहल शाह आणि मोठ्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisement -

हेही वाचा : नवनीत राणांना अश्रू अनावर; उद्धव ठाकरेंवर केले गंभीर आरोप!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -