घरमहाराष्ट्रस्टार प्रचारक भाजपचे मोदी,शहा, गडकरी तर काँग्रेसचे सोनिया, मनमोहन,राहुल

स्टार प्रचारक भाजपचे मोदी,शहा, गडकरी तर काँग्रेसचे सोनिया, मनमोहन,राहुल

Subscribe

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवारांनी आपआपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. काँग्रेस आणि भाजपच्या यादीत प्रत्येकी ४० जणांचा समावेश आहे. काँग्रेसकडून सोनिया गांधी, मनमोहन सिंग, राहुल गांधी, अभिनेता शत्रुघ्न सिन्हा तर भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस आदी प्रचाराची धुरा सांभाळणार आहेत.काँग्रेसने मुंबईचे माजी अध्यक्ष मिलिंद देवरा आणि संजय निरुपम यांना यादीत स्थान दिलेले नाही. तर भाजपच्या यादीत उमेदवारी नाकारलेले एकनाथ खडसे २५ व्या तर विनोद तावडे २७ व्या स्थानावर आहेत.

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि भाजपचा प्रचार करणार्‍या प्रत्येकी ४० स्टार प्रचारकांची यादी दोन्ही पक्षांनी निवडणूक आयोगकडे सादर केली आहे. या यादीत सोनिया गांधी, मनमोहन सिंग, राहुल गांधी, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, मल्लिकाजुन खरगे यांच्यासह अनेक दिग्गजांचा समावेश आहे. तर भाजपच्या यादीत नरेंद्र मोदी, अमित शहा, स्मृती इराणी, नितीन गडकरी यांच्यासह ४० नेत्यांची नावे आहेत.

- Advertisement -

महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस, भाजपकडून आपआपल्या उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. भाजप- काँग्रेसच्या उमेदवारांनी त्यांचे निवडणूक अर्जही सादर केले आहेत. त्यापैकी अनेकांनी प्रचाराचा नारळदेखील वाढविला आहे. आता सर्वांचे लक्ष काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठी सोनिया गांधी, प्रियंका गांधी आणि राहुल गांधी तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सभांकडे लागून राहिले आहे.

भाजपचे स्टार प्रचारक
नरेंद्र मोदी, अमित शहा, स्मृती इराणी, जगत प्रकाश नड्डा, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, पीयूष गोयल, प्रकाश जावडेकर, वसुंधराराजे सिंधिया, बी. एल. संतोष, व्ही. सतीश. सरोज पांडे, शिवराजसिंह चौहान, मुख्तार अब्बास नक्वी, योगी आदित्यनाथ, भूपेंद्र यादव, केशवप्रसाद मौर्य, लक्ष्मण सावदी, पुरुषोत्तम रुपाला, विजय रुपानी, किसन रेड्डी, चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे- पाटील, एकनाथ खडसे, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, पंकजा मुंडे, गिरीश महाजन, आशीष शेलार, रणजीत पाटील, विजयराव पुराणिक, पूनम महाजन, विजया रहाटकर, माधवी नाईक, सुजितसिंग ठाकुर, पाशा पटेल, भाई गिरकर, प्रसाद लाड, हरिश्चंद्र भोये.

- Advertisement -

काँग्रेसचे स्टार प्रचारक
मल्लिकार्जुन खरगे, गुलाब नबी आझाद, ज्योतिरादित्य सिंदीया, बाळासाहेब थोरात, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, कमलनाथ, भूपेश बघेल, मुकुल वासनिक, अविनाश पांडे, राजीव सातव, रजनी पाटील, सचिन पायलट, शत्रुघ्न सिन्हा, अभिनेत्री नगमा, विजय वडेट्टीवार, मधुकर भावे, नाना पटोले, आर. सी. खुंटीया, नितीन राऊत, माणिकराव ठाकरे, एकनाथ गायकवाड, सचिन सावंत, हुसेन दलवाई, नसीम खान, बसवराज पाटील, यशोमती ठाकुर, विश्वजीत कदम, अमर राजूरकर, सुश्मीता देवी, कुमार केतकर, चारूलता टोकस, उदित राज, नदीम जावेद

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -