घरमहाराष्ट्रडिझेलच्या तुटवड्याने एसटीच्या फेर्‍या रद्द; प्रवाशांचे हाल

डिझेलच्या तुटवड्याने एसटीच्या फेर्‍या रद्द; प्रवाशांचे हाल

Subscribe

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे कर्मचार्‍यांना आधीच नोव्हेंबरचा पगार उशीरा देण्यात आल्याने त्यांच्यामध्ये नाराजी पसरली असतानाच नाशिक आगार क्रमांक एकमध्ये डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याने सोमवारीएसटीच्या फेर्‍या रद्द करण्यात आल्या. मेंटेनन्सच्या नावाखाली अनेक एसटी कर्मचार्‍यांना सक्तीच्या सुट्ट्या देण्यात आल्या होत्या. मात्र, आगार क्रमांक एकमध्ये कोणताही डिझेलचा तुटवडा नसल्याचा दावा आगार व्यवस्थापक दिलीप नलावडे यांनी केला आहे. एसटी बसेस उशीरा आगारामध्ये येत असल्याने अनेक प्रवाशांचे हाल झाल्याचे दिसून आले.

‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे ब्रीदवाक्य असलेले महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी बसेस प्रवाशांची संख्या घटू लागल्याने महामंडळ आर्थिक अडचणीत सापडले आहे. त्याचा परिणाम कामगारांच्या वेतन देण्यावर झाला आहे. त्यातच नाशिक आगार क्रमांक एकमध्ये रविवारपासून डिझेलचा तुटवडा निर्माण झाला. आगारामध्ये डिझेल नसल्याचे अनेक बसेच्या फेर्‍या रद्द करण्यात आल्या. डिझेलचा तुटवडा नव्हे तर बसेस मेंटेनन्ससाठी असल्याने काही कर्मचार्‍यांना सक्तीच्या सुट्टी देण्यात आली. तर दुसरीकडे आगारामध्ये पुरेसे डिझेल असून विभागातील सर्व बसेसच्या फेर्‍या नियमितपणे सुरु असल्याचा दावा एसटी प्रशासनाकडून करण्यात आला आहे. नाशिक आगार एकमध्ये १३५ महामंडळाच्या व ४४ भाडे तत्वावरील बस आहेत. त्यासाठी दररोज १६ ते १७ हजार लिटर डीझेलची आवश्यकता असते. रविवारी ५० बसेसमध्ये डिझेल भरण्यात आले असून दोन हजार लिटर डिझेल आगाराच्या पंपात शिल्लक आहे. डीझेल घेऊन येणारा टँकर पंक्चर झाल्याने आगारात डिझेल उशीरा आल्याचे आगार व्यवस्थापक दिलीप नलावडे यांनी सांगितले.

- Advertisement -

 डिझेल टँकरमुळे झाला उशीर

नाशिक आगार एकमधील १३५ बसेस आणि कंत्राटदारांच्या ४४ शिवशाही असे एकूण १७९ बसेस दररोज धावतात. आगारमध्ये ३६ तासांपासून डिझेल उपलब्ध नसल्याने काही बसच्या फेर्‍या रद्द करण्यात आल्या आहेत, असा आरोप कर्मचार्‍यांकडून करण्यात आला. इंडीयन ऑईलचा डिझेल टॅकरचा टायर शहापूरजवळ पंक्चर झाल्याने टँकर सोमवारी दुपारी ४ वाजता नाशिक आगारात आला. त्यानंतर गाड्यांमध्ये डिझेल भरण्यात आले.

बससेवा सुरळीत

नाशिक आगार एकमधील सर्व बसेस नियमितपणे सुरु आहे. प्रवाशी वाहतुकीवर कोणत्याही परिणाम झालेला नाही. डिझेलच्या तुटवड्याची माहिती चुकीची आहे. दुसर्‍या आगारमधून एसट्यांमध्ये डिझेल भरण्यात आले आहे, असे यंत्र अभियंता मुकुंद कुंवर यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -