घरताज्या घडामोडीयुती तुटली म्हणजे धर्मांतर केलं नाही - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

युती तुटली म्हणजे धर्मांतर केलं नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Subscribe

अखंड हिंदुस्तानच्या स्वप्नाचं काय झालं? असा सवाल उपस्थित करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपचा हिंदुत्व, एनआरसी आणि सीएबी प्रश्नी खरपूस समाचार घेतला.

सध्या नागपूरमध्ये राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरु आहे. आज पहिला दिवस होता. नव्या सरकारचं पहिलचं हिवाळी अधिवेशन आहे. अधिवेशनाचा पहिला दिवस पार पडल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याची सूत्रं हाती घेतल्यानंतर पहिल्यांदाच शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी युती तुटली म्हणजे आम्ही धर्मांतर केलं नाही, असं म्हणत सावरकरांच्या स्वप्नासाठी युती केली होती पण अखंड हिंदुस्तानच्या स्वप्नाचं काय झालं? असा सवाल उपस्थित करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपचा हिंदुत्व, एनआरसी आणि सीएबी प्रश्नी खरपूस समाचार घेतला.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

नागपूर येथे हिवाळी अधिवेशनादरम्यान आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच शिवसैनिकांशी संवाद साधला. नागपूरमध्ये आयोजित सेना मेळाव्याला त्यांनी संबोधित केले. यावेळी त्यांनी राज्यातील तसेच देशपातळीवरील विविध प्रश्नांवर केंद्र सरकार आणि राज्यातील विरोधी पक्षाला धारेवर धरले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, “शिवसेना काय आहे ते सगळ्या देशाला ठाऊक आहे, आम्ही कोणताही बुरखा पांघरलेला नाही. आम्ही धर्मांतर केलेले नाही. आम्ही आजही हिंदुत्त्ववादीच आहोत, अशी टीका करतानाच हिंदुत्त्वाचा बुरखा पांघरुन वावणार्‍यांना आम्ही सोडणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपचे नाव घेता दिला. त्या पक्षाने २०१४ साली युती तोडली होती. त्यानंतरही आम्ही हिंदूच होतो. शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याबाबत आपण कटीबद्ध आहोत,” असेही ते म्हणाले.

- Advertisement -

छोटी आव्हाने स्विकारत नाही

ते पुढे म्हणाले की, “ध्यानीमनी नव्हते तरीही मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न पूर्ण झाले. तुमचा कुटुंबप्रमुख राज्याचा मुख्यमंत्री आहे याचा अभिमान वाटतो आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर माझ्या शिवसैनिकांना भेटायला आलो आहे. मी आज कुटुंबप्रमुख म्हणून भेटायला आलो आहे. जे शिवधनुष्य हाती घेतले आहे ते तुमच्या सगळ्यांच्या साथीने पेलले आहे. आव्हान मोठे आहे, मात्र छोटी आव्हाने आपण स्वीकारत नसतो,” असेही उद्धव ठाकरे यांनी ठामपणे सांगितले.

पण कुठे आहेत अच्छे दिन?

“आपल्याला आधीच्या सरकारसारखे वागायचे नाही. कितीही मोठे झाले तरीही आपण नम्र राहिले पाहिजे. आपलीच सत्ता राज्यावर आहे, हा विश्वास आपल्याला निर्माण करायचा आहे. आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मुद्यावरून भाजपने सभागृहात गोंधळ घातला होता. शेतकर्‍यांना कर्जमाफी कधी देणार? असा प्रश्नही विचारला होता. आमचे सरकार शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यास कटीबद्ध आहे,” असे उद्धव ठाकरे म्हणाले. विरोधक आम्हाला आमच्या वचनांची आठवण करून देत आहेत. त्याची काहीही गरज नाही आमचा काही स्मृतीभ्रंश झालेला नाही. पण कुठे आहेत अच्छे दिन? विचारल्यावर तुमची बोबडी का वळते?” असा सवालही उद्धव ठाकरे यांनी विचारला.

उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील ठळक मुद्दे

  • शिवधनुष्य पेलण्याचे काम एकट्याचे नाही.
  • मोठी आव्हानं झेलतो. छोटी आव्हानं नाही.
  • तुमच्यासमोर कुटुंबप्रमुख म्हणून आलो.
  • लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करणार.
  • गेल्या सरकारमध्ये अर्धेमुर्धे होते.
  • मी बदललो नाही.
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सेनेचा मेळावा.
  • देशात शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे.
  • ध्यानीमनी नसलेलं मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न आव्हान.
  • तुमचा कुटुंबप्रमुख राज्याचा मुख्यमंत्री.
  • होय आम्ही हिंदुत्ववादी आहोत.
  • शेतकऱ्यांचे प्रश्न नवीन नाहीत ते सोडवणे प्राधान्य.
  • हिंदुत्वाचा बुरखा घालून देशावर वार नको.
  • युती तुटली म्हणजे धर्मांतर नाही केलं.
  • माझ्याकडे निवेदांचा पाऊस पडतोय.
  • पूर्ण विदर्भ भगवा करा.
  • जनतेशी नम्र रहा बाळासाहेबांची शिकवण.
  • युती तुटली म्हणून धर्मांतर नाही.
  • कितीही मोठा झालो तरी नम्र रहावं भाजपला चिमटे.
  • आधीच्या सरकारसारखं वागायचं नाही.
  • जनतेला जे मिळालं नाही ते देणार.
  • नागपुरातल्या कार्यकर्ता मिळाव्यात भाजपला टोला.
  • हे सरकार जनतेचं सरकार आहे.
  • शिवाजी महाराज आपले दैवत.
  • अखंड हिंदुस्तानासाठी आपण युती केली.
  • शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करणार.
  • आम्ही वचनबद्ध आहोत.
  • ५०चा पाढा अजूनही सुरु आहे.
  • सावरकरांच्या स्वप्नासाठी युती केली होती.
  • अखंड हिंदुस्तानाच्या स्वप्नाचं काय झालं?
  • आपल्या देशात येणाऱ्या लोकांचं काय?
  • निर्वासित किती येणार कुठून येणार.
  • प्रश्नांची संसदेत उत्तरं मिळाली नाही.
  • अच्छे दिन कधी येणार म्हणताच बोबडी वळली.
  • सीमावासियांचं पुनर्वसन कधी करणार.
  • बाहेरून येणाऱ्या लोकांना कुठे ठेवणार.
  • कांदा महाग होतो त्याबद्दल बोलत नाहीत.
  • पाकला संपवून का टाकत नाहीत.
  • शिवसेनेची ओळख ठाम आहे.
  • आम्ही तेवढेच हिंदू असा आव कशाला.
  • शिवसेनेने कधी बुरखा घातलेला नाही.
  • पाकिस्तान्यांना खतम का करत नाहीत.
  • लोकांच्या प्रश्नांवर उत्तर कुठं आहेत.
  • देशात भयानक अस्वस्थता.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -