घरमहाराष्ट्रपिंपरीत तरुणाची डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या

पिंपरीत तरुणाची डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या

Subscribe

पिंपरीतील एच. ए. मैदानावर तरुणाच्या डोक्यात दगड घालून त्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

पिंपरीतील एच. ए. मैदानावर तरुणाच्या डोक्यात दगड घालून त्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. तसेच त्याची ओळख पटू नये म्हणून त्याचा मृतदेह जाळण्यात आला. ही घटना आज, पहाटेच्या सुमारास उघड झाली. अजय नागोसे असं खून झालेल्या १९ वर्षीय तरुणाचे नाव आहे. तो एच. ए. कंपनीच्या कॅन्टीनमध्ये कामाला होता. याप्रकरणी पिंपरी पोलीस अधिक तपास करत आहेत.

रात्रीपाळीला गेलेला तरुण परतलाच नाही

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत अजय हा एच. ए. कंपनीच्या कॅन्टीनमध्ये कामाला होता. शनिवारी रात्रपाळी आहे, असं त्याने वडिलांना फोनद्वारे सांगितलं होतं. त्यामुळे तो रात्रभर बाहेरच होता. दरम्यान, आज सकाळी एच. ए. मैदानावर क्रिकेट खेळण्यासाठी मुलं आली होती. त्यांना मृतदेह जळताना दिसला. याची माहिती त्यांनी पिंपरी पोलिसांना दिली. अगोदर डोक्यात दगड घालून खून केला असून त्याचा मृतदेह जाळण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मृतदेहाशेजारी अजयचा मोबाईल सापडला असून त्याची ओळख पटलेली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -