घरमहाराष्ट्रदहावी, बारावीचा अभ्यासक्रम ५० टक्क्यांनी कमी करण्याची विद्यार्थ्यांची मागणी

दहावी, बारावीचा अभ्यासक्रम ५० टक्क्यांनी कमी करण्याची विद्यार्थ्यांची मागणी

Subscribe

परीक्षा केंद्र निवडण्याची मुभा देण्याची विद्यार्थ्यांची मागणी

दहावी आणी बारवीचा अभ्यासक्रम ५० टक्यांनी कमी करा आणी परीक्षा केंद्र हे विद्यार्थ्यांना निवडू द्यावेत या मागणीसाठी विद्यार्था आक्रमक झाले आहेत. राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. अशातच दहावी, बारावी, एमपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षा घेण्यात येणार आहेत. याच पार्श्वभूमीवर दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी आज लातूर विभागीय परीक्षा केंद्रावर अभ्यासक्रम ५० टक्क्यांनी कमी करावा तसेच, विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र निवडण्याची मुभा द्यावी या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी जोरदार निदर्शने केली आहेत. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे दहावी व बारावीच्या परीक्षांसाठी परीक्षा केंद्र निवडण्याची मुभा देण्यात यावी अशी या विद्यार्थ्यांची मागणी आहे.

एकीकडे रुग्णसंख्येचे वाढते संकट आणि दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या तोंडावर आलेल्या परिक्षा यामुळे विद्यार्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. राज्यात पुन्हा एकदा कोरोणाचे प्रमान वाढले आहे. याचा फटका मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक, नागपूर अशा मोठ्या शहराला बसून तेथील कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. खबरदारी म्हणून बहुंताश भागात विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शिकवले जात आहे. ज्या जिल्ह्यात कोरोणाचे प्रमाण कमी आहे, त्या ठीकाणी विद्यार्थांना शाळेत येण्याची परवानगी देण्यात आली आहे. परंतु अनेक भागात नेटवर्कचा अडथळा येत असल्याने विद्यार्थांना शिकवलेले काही समजत नाही. वारंवार येणाऱ्या अडथळ्यांमुळे विद्यार्थ्यांना अभ्यासास पुरेसा वेळ मिळालेला नाही, अशी भूमिका पालक आणि विद्यार्थ्यांनी मांडली आहे. त्यामुळे दहावी आणि बारावीचा अभ्यासक्रम ५० टक्क्यांनी कमी करावा अशी मागणी पालक आणी विद्यार्थांनी केली आहे. त्यासाठी लातूर विभागीय परीक्षा मंडळाच्या कार्यालयासमोर आज या मागणीला जोर लावून धरत निदर्शने करण्यात आली. त्यामुळे आता सरकार कोणता निर्णय घेईल याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -