घरठाणेमहिलेच्या पोटातून बाहेर काढला अडीच किलोचा मांसाचा गोळा

महिलेच्या पोटातून बाहेर काढला अडीच किलोचा मांसाचा गोळा

Subscribe

ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया

ठाणे: शासकीय रुग्णालय म्हटले तर सर्वजण नाके मुरडतात, मात्र याच म्हणजे ठाणे जिल्हा विठ्ठल सायन्ना (सामान्य) शासकीय रुग्णालयात टिटवाळा येथील ४२ वर्षीय महिलेच्या पोटात एकात एक अशा तीन गाठी होऊन तयार झालेला दोन किलो ६०० ग्रॅम वजनाचा ह्दय आकाराचा मासाचा गोळा यशस्वीरित्या बाहेर काढण्यात तेथील डॉक्टरांच्या चमूला यश आले आहे. ही गुंतागुंती शस्त्रक्रिया सोमवारी तब्बल दोन ते अडीच तास चालली. तर, सद्यस्थितीत त्या रुग्णाची प्रकृती स्थिर असून लवकरच त्या रुग्णाला घरी सोडण्यात येईल असे डॉक्टरांनी सांगितले.

पंधरा दिवसांपूर्वी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात टिटवाळा येथील महिला पोट दुखत असल्याने तपासणी करण्यासाठी आल्या होत्या. सोनोग्राफी आणि एम् आर आय चाचणी केली असता, त्या महिलेच्या पोटात गाठ असल्याचे स्पष्ट झाले. तसेच त्या गाठीमुळे मूत्रनलिकेला सूज आली होती. याशिवाय ती आतड्यांच्या भोवताली होती. त्यातच हा गोळा तीन गाठींमध्ये एकरूप झाला होता. त्यामुळे त्याला ह्दयाचा आकार आलेला होता. ही गाठ काढण्यासाठी शस्त्रक्रिया करणे हाच एक पर्याय डॉक्टरांकडे होता. त्यातच गुंतागुंतीची शस्त्रक्रिया ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी यशस्वीपणे पार पडली. याचदरम्यान त्या महिलेच्या पोटातुन सुमारे अडीच किलो वजनाचा मासाचा गोळा बाहेर काढला. ही शस्त्रक्रिया साधारणपणे अडीच तास चालली. ही शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात डॉ.अर्चना आखाडे, डॉ. शोभना चव्हाण आदींचा सहभाग होता. तसेच सर्जन असलेले डॉ निशिकांत रोकडे यांचीही या शस्त्रक्रियेसाठी मदत घेण्यात आली. अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

- Advertisement -

” महिलेच्या गर्भाशय पिशवीची सोनोग्राफी आणि एमआरआय काढल्या नंतर तिच्या पोटात तीन मासाचे तुकडे एकमेकांमध्ये गुंतलेले असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे शस्त्रक्रिया थोडी अवघड होती. तसेच दोन किलो ६०० ग्रॅम वजनाचा गोळा असल्याने साधारणपणे अडीच तास शस्त्रक्रियेसाठी लागला. आता त्या रुग्णाची प्रकृती आता स्थिर असून लवकरच त्यांना घरी सोडण्यात येईल.”
-डॉ. सचिन घोलप ,जिल्हा स्त्रीरोग तज्ज्ञ, ठाणे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -