घरमहाराष्ट्रमुंबईत तापमान घटेल पण प्रदूषण वाढेल, हवेची पातळी चिंता वाढवणारी

मुंबईत तापमान घटेल पण प्रदूषण वाढेल, हवेची पातळी चिंता वाढवणारी

Subscribe

Air Quality Index | २५ डिसेंबरपर्यंत मुंबईत तापमानाचा पारा आणखी खाली उतरण्याची शक्यता आहे. थंडी वाढल्यावर प्रदूषणही वाढण्याची शक्यता आहे. किमान तापमान १३ ते १४ अंशांपर्यंत जाऊन कमाल तापमानातही घट होऊ शकते. त्यामुळे मुंबईत पुन्हा धुरके निर्माण होऊ शकतात.

मुंबई – मुंबईच्या प्रदूषणात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. गुरुवारी मुंबईची हवा वाईट नोंदवली गेली. पुढचे काही दिवस मुंबईची हवा वाईट ते अति वाईट नोंदवली जाणार असल्याची शक्यता सफर या हवेची गुणवत्ता मोजणाऱ्या प्रणालीच्या माध्यमातून वर्तवण्यात आली आहे.

मुंबईत गुरुवारी हवेचा गुणवत्ता निर्देशांक (Air Quality Index) २८० च्या पुढे होता. माझगाव ३१६, चेंबूर ३२३, वांद्रे कुर्ला संकूल ३३७, अंधेरी ३१५, कुलाबा २७६, मालाड २९५ असा पीएम २.५ चा निर्देशांक गुरुवारी नोंदला गेला. तुलनेने वरळी, भाडूंप आणि बोरिवलीत हवेची गुणवत्ता मध्यम होती.

- Advertisement -

हेही वाचा – कर्नाटक- महाराष्ट्र सीमावाद अन् मुंबईतील प्रदूषणाच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरे सरकारवर बरसले, म्हणाले..

मुंबईच्या तापमानात सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहेत. गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यात उकाडा वाढला होता. मात्र, दोन दिवासांपासून थंडीने जोर धरला आहे. २५ डिसेंबरपर्यंत मुंबईत तापमानाचा पारा आणखी खाली उतरण्याची शक्यता आहे. थंडी वाढल्यावर प्रदूषणही वाढण्याची शक्यता आहे. किमान तापमान १३ ते १४ अंशांपर्यंत जाऊन कमाल तापमानातही घट होऊ शकते. त्यामुळे मुंबईत पुन्हा धुरके निर्माण होऊ शकतात.

- Advertisement -

हेही वाचा – वसईमध्ये प्रदूषण वाढले, मुंबई -अहमदाबाद महामार्ग सापडला विळख्यात

काळजी घ्या, डॉक्टरांचं आवाहन

हवेचं प्रदूषण वाढल्याने मानवाच्या श्वसन मार्गात आणि फुफ्फुसात त्रास जाणवू लागतो. त्यामुळे हृदयरोग असणाऱ्यांनी याकाळात काळजी घेण्याचं आवाहन डॉक्टरांनी केलं आहे. दमा आणि कर्करोगग्रस्त रुग्णांनी या काळात अधिक काळजी घेणे गरजेचं असतं. हवेच्या प्रदूषणामुळे सामान्य माणसाला घसा खवखवणे, डोळ्यांतून पाणी येणं, बेशुद्ध पडणे आदी त्रास होऊ शकतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -