घरमहाराष्ट्रMumbai Police : ठाकरे गटाचा मोर्चा निघणार मेट्रो सिनेमाजवळून; पोलिसांनी दिली परवानगी

Mumbai Police : ठाकरे गटाचा मोर्चा निघणार मेट्रो सिनेमाजवळून; पोलिसांनी दिली परवानगी

Subscribe

 

मुंबईः ठाकरे गटाचा मोर्चा आता मेट्रो सिनेमाजवळून निघणार आहे. मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान असा या मोर्चाचा मार्ग असेल. पोलीस आणि ठाकरे गट यांच्यात झालेल्या बैठकीत हा तोडगा निघाला आहे. त्यानुसार ठाकरे गटाचा १ जुलै २०२३ रोजी मोर्चा निघेल.

- Advertisement -

हेही वाचाःSanjay Raut : अतिरेक्यांचा मोर्चा आहे का? राऊतांचा फडणवीसांना थेट सवाल

पालिकेतील घोटाळे बाहेर काढण्यासाठी तसेच कथित कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी सुरु असलेल्या ईडी चौकशी विरोधात ठाकरे गट मोर्चा काढणार आहे. या मोर्चाचे नेतृत्त्व आदित्य ठाकरे करतील, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. मेट्रो सिनेमा ते टाईम्स् ऑफ इंडियाची इमारत असे या मोर्चाचे नियोजन होते. या मोर्चामुळे कायदा आणि सुव्यवस्थेच प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे कारण देत पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली होती. त्यानंतर पोलीस आणि ठाकरे गटाची यासंदर्भात बैठक झाली. बैठकीत मार्ग बदल करण्याची सुचना ठाकरे गटाला करण्यात आली. त्यानुसार हा मोर्चा टाईम्स् ऑफ इंडियापर्यंत न नेता आझाद मैदानापर्यंत आयोजित करावा, असा तोडगा बैठकीत निघाला.

- Advertisement -

घोटाळ्याचीच चौकशी करायची असेल तर…

मुंबई महानगरपालिकेच्या कथित घोटाळ्यावरून उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्ता मेळाव्यात सरकारवर निशाणा साधला होता.  मुंबई महानगरपालिकेतील कोविडबाबतची चौकशी कराच. पण सोबतच ठाण्याची, पिंपरी-चिंचवड चौकशी करा. नागपूर मनपाची करा. हिंमत असेल तर पीएम केअर फंडची चौकशी करा. ज्या सरकारचा जन्म खोक्यातून ते आमची काय चौकशी करणार. खोके बहाद्दरांनी तुमचा हा जो सगळा सुरत, गोवाटी, गोवा, via सगळा हा जो खर्च झाला hotelचा charter flightचा नितीन देशमुखनी सांगितलेलं आहे, त्या खर्चाचा आढावा घ्या, असे आव्हानही ठाकरेंनी राज्य सरकारला दिले होते.  समान नागरी कायद्याप्रमाणे आम्ही सांगू त्यांची ईडी, सीबीआयने चौकशी करावी. समान नागरी कायदा म्हणता मग ईडी सीबीआयचा अधिकार आम्हाला द्या. आम्ही सांगतो धाडी टाकायला. तुमच्या घोटाळ्यावर राहुल गांधी यांनी सवाल केला. अरविंद केजरीवाल यांनी सवाल केला. त्याचं उत्तर दिलं जातन नाही. प्रश्न विचारला तर कारवाई होते. पण उत्तर देत नाही, असे खडेबोल उद्धव ठाकरे यांनी सुनावले होते.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -