घरमहाराष्ट्रSanjay Raut : अतिरेक्यांचा मोर्चा आहे का? राऊतांचा फडणवीसांना थेट सवाल

Sanjay Raut : अतिरेक्यांचा मोर्चा आहे का? राऊतांचा फडणवीसांना थेट सवाल

Subscribe

 

मुंबईः मुंबई महापालिकेवर निघणारा मोर्चा अतिरेक्यांचा आहे का? कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असेल तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी केली.

- Advertisement -

संजय राऊत म्हणाले, मुंबईकरांचे प्रश्न घेऊन हा मोर्चा निघणार आहे. आम्ही अनेक घोटाळे बाहेर काढणार आहोत. या मोर्चाने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार असेल तर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी राजीनामा द्यायला हवा. फडणवीसांना कायदा आणि सुव्यवस्था ठेवता येत नसेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. तुम्ही गृहमंत्री असाल तर आम्ही शिवसैनिक आहोत.

हेही वाचाःCrime : ठाकरे गटाच्या माजी नगरसेविकेच्या घरावर हल्ला, पुतणी गंभीर जखमी; शिवसेनेचे आमदार धावले मदतीला

- Advertisement -

४० वर्षे शाखा होती, कारवाईचे आदेश मुख्यमंत्र्यांचे

४० वर्षे तेथे शिवसेनेची शाखा होती. अचानक कशी तोडण्यात आली. हे आदेश मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगाल्यावरुन आले होते. मुख्यमंत्र्यांच्या मुलाने हे कारवाईचे आदेश दिले. आमच्या सर्व माहिती आहे. बाळासाहेब ठाकरे हे राष्ट्रीय पुरुष आहेत. त्यांच्या फोटोवर हातोडा चालवणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे. अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची ताकद तुमच्यात नाही. आधी त्या अधिकाऱ्यावर कारवाई करा. कोणत्याही सरकारी अधिकारी किंवा कर्मचाऱ्याचे खच्चीकरण करण्याचे आमचे उद्दिष्ट नाही. पण जे चुकीचे आहे ते चुकीचेच आहे, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

अभियान कसले राबवता, निवडणुका घ्या

अभियान कसले राबवता. हिमत असेल तर निवडणुका घ्या. तुम्ही निवडणुका घ्यायला घाबरता. त्यामुळे हिमत असेल तर निवडणुकाा जाहिर करा, असे आवाहन संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिले.

आमच्यावर बोलणारे पंतप्रधान मणिपूरवर गप्प का?

मणिपूरमधला हिंसाचार थांबत नाही. मणिपूर हातातून जात आहे. त्यामुळे आमच्यावर बोलणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरवर गप्प का?, असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला. संजय राऊत म्हणाले, आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या मोदींनी संसदेत राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे का दिली नाहीत. संसदेचे कामकाज बंद पडले, तरी मोदी का गप्प होते. अरविंद केजरीवाल यांनी भ्रष्टाचाराचे मुद्दे उपस्थित केले. त्यावर मोदी का नाही बोलत. भ्रष्टाचार संपावा ही आमचीही इच्छा आहे. पण केवळ विरोधकांनाच टार्गेट करायचं हे चुकीचं आहे. पंतप्रधान मोदी हे महागाईवर बोलत नाहीत. बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्यावर प्रश्नावर मोदी गप्प आहेत. केवळ आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करतात. मात्र मीही महाराष्ट्रातील एक लाख कोटीच्या भ्रष्टाचाराची तक्रार सक्तवसुली संचलनालयाकडे (ईडी) केली आहे. म्हणजे ही तक्रार तुमच्यापर्यंत पोहोचली आहे. मंत्री दादा भुसे, राधाकृष्ष विखे-पाटील, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, राहुल कुल व गुलाबराव पाटील यांच्याविरोधातील ही तक्रार आहे. तुमच्या सोबत ही मंडळी सत्ता उपभोगत आहे. त्यांच्यावर मोदी कधी बोलणार आहेत. आधी त्यांच्यावर बोला. मग आमच्यावर टीका करा, असा टोलाही संजय राऊत यांनी हाणला.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -