घरमहाराष्ट्रठाकरे सरकारचा नवा घोटाळा बाहेर काढणार

ठाकरे सरकारचा नवा घोटाळा बाहेर काढणार

Subscribe

माझ्यावर आयएनएस विक्रांत निधी घोटाळ्याचा आरोप करण्यात आला, पण घोटाळ्याचा ५८ कोटींचा आकडा कुठून आला, असे न्यायालयाने विचारूनही ठाकरे सरकारला उत्तर देता आले नाही. घोटाळा झाला म्हणून 10 वर्षांनंतर आकडा ठेवतात. पोलीस ४२० कलमाखाली एफआयआर दाखल करतात अन् प्रेस नोट काढतात. जेव्हा जेव्हा ठाकरे सरकारच्या मंत्री आणि नेत्यांवर कारवाई झाली, तेव्हा तेव्हा असे स्टंट बघायला मिळाले, पण आपण न घाबरता ठाकरे सरकारचा नवा घोटाळा बाहेर काढणार असल्याचे म्हणत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुंबई पोलिसांना याबाबत पुराव्यांसह १०० पानी निवेदन सादर केल्याचा दावा केला. गुरुवारी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आयएनएस विक्रांत बचाव निधी घोटाळ्याच्या प्रकरणात कोर्टाकडून दिलासा मिळाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना किरीट सोमय्या म्हणाले की, मी काही व्यक्तींसाठी नॉट रिचेबल असेल, बाकी मी व्यवस्थित काम करीत होतो. त्याचा एक नमुना आपल्याला बघायला मिळेल. मी महाराष्ट्राच्या जनतेला वचन देतो की ठाकरे सरकारचा आणखी एक घोटाळा मी जनतेसमोर ठेवणार आहे.

- Advertisement -

उद्धव ठाकरे यांचा मेहुणा श्रीधर पाटणकरची संपत्ती जप्त झाली. नवाब मलिक स्वतःही जप्त झाले आणि त्यांची संपत्तीही जप्त झाली. संजय राऊत यांचीही संपत्ती जप्त झाली. अनिल देशमुख, प्रताप सरनाईक, भावना गवळी, आनंद अडसूळ, अजित पवार, यशवंत जाधव यांचाही त्यात समावेश आहे. आणखीही अनेकांची संपत्ती जप्त होईल. हसन मुश्रीफ, अनिल परब, सुजित पाटकर, सदानंद कदम यांचाही या घोटाळेबाजांमध्ये समावेश आहे. डझनभर लोकांची संपत्ती घोटाळ्यात अटॅच झाली. कोर्टाने त्यावर रबर स्टँप लावला. जनतेचे पैसे लुटून असे घोटाळे करणारे हे हिंदुस्थानमधील पहिले राज्य सरकार आहे. उद्धव ठाकरे यांनी हिंमत असेल तर याचे उत्तर द्यावे, असे आव्हानही किरीट सोमय्या यांनी दिले.

मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी बोलावल्यानंतर माझे प्रतिनिधी चौकशीसाठी गेले होते. बुधवारी माझ्या प्रतिनिधीने पुराव्यासह १०० पानी निवेदन पोलिसांना दिले आहे. मी विक्रांतचे अभियान १९९७-९८मध्ये सुरू केले होते. डॉ. नितू मांडके, किरण पैंजणकर यांनी ही मोहीम सुरू केली होती. त्याला बाळासाहेब ठाकरे यांनी आशीर्वाद दिला होता.

- Advertisement -

तत्कालीन सेन-भाजपा सरकारचे मुख्यमंत्री म्हणून मनोहर जोशी, गोपीनाथ मुंडे यांनी विक्रांतसाठी ४०-४२ कोटी रुपये राज्य सरकारकडून देण्याची तयारी दाखवली. त्यानंतर केंद्र सरकारचे संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस स्वतः २००३ मध्ये आम्ही भांडुपमध्ये घेतलेल्या ४२ हजार विद्यार्थ्यांच्या निबंध स्पर्धेला आले होते. संसदेत अनेक वेळा मी विक्रांतचा मुद्दा उपस्थित केला होता. चर्चगेट स्टेशनवर प्रतीकात्मक कार्यक्रम म्हणून निधी गोळा करण्यात आला होता, असे किरीट सोमय्या यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -