घरमहाराष्ट्रपालकमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाणे कोविड रुग्णालयाला अचानक भेट

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाणे कोविड रुग्णालयाला अचानक भेट

Subscribe

पीपीई किट घालून केली रूग्णांची आणि डॉक्टरांची विचारपूस उद्यापासून रूग्णांना मिळणार दूध, अंडी आणि फळे

राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी आज अचानक ठाणे कोविड रुग्णालयाला भेट दिली. शिंदे यांनी पीपीई किट घालून कोरोनाबाधित रूग्णांची विचारपूस करून त्यांचे आणि तेथे काम करणाऱ्या डॉक्टरांचे व इतर स्टाफचे मनोधैर्य उंचावले. यावेळी त्यांनी काळजी घ्या व लवकर बरे व्हा अशा शुभेच्छा दिल्या. दरम्यान कोविड रूग्णालयातील सर्व रूग्णांना त्यांच्या वतीने दूध, अंडी आणि फळे देण्याचा निर्णय घेतला.

eknath shinde visit thane covid hospital 2

- Advertisement -

कल्याणची बैठक आटोपून शिंदे ठाण्याला परत निघत होते. अचानक त्यांनी गाडी कोविड रुग्णालयाकडे घेण्यास सांगितली. तेथे पोहोचल्यानंतर तेथील सुविधांची पाहणी केली आणि पीपीई किट घालून डॉक्टरांसोबत चक्क कोरोनाबाधित रूग्णांच्या वॉर्ड्सना भेटी दिल्या. शिंदे यांनी डायलेसीस, आयसीयू, ॲाक्सीजन आणि नॉन ऑक्सिजन वार्ड्सना भेटी दिल्या. नुसत्याच भेटी दिल्या नाही तर त्यांची विचारपूस केली. जेवण व्यवस्थित मिळते का? औषधे दिली जातात का? काही अडचण आहे का? अशी विचारपूस केली. घाबरू नका, काळजी घ्या आणि लवकर बरे व्हा असे म्हणत त्यांनी तेथील रूग्णांचे मनोबल वाढविले. त्याचबरोबर डॉक्टर्स, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ यांच्याशीही संवाद साधून स्वत:ची काळजी घेण्याच्या सूचना केल्या. या भेटीत त्यांनी रूग्णांना गरम पाणी मिळते का तसेच शौचालये आणि बाथरूम साफ आहेत का याचीही चौकशी केली. यावेळी त्यांच्यासोबत उप आयुक्त विश्वनाथ केळकर, संदीप माळवी आणि डॉक्टर्स उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -