घरCORONA UPDATECorona Mumbai Update: मुंबईत आज कोरोनाचे १३०८ नवे रुग्ण, तर ३९ मृत्यू

Corona Mumbai Update: मुंबईत आज कोरोनाचे १३०८ नवे रुग्ण, तर ३९ मृत्यू

Subscribe

मुंबईमध्ये १३०८ नवे रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांची संख्या ९१ हजार ४५७ वर पोहोचली आहे. त्याचप्रमाणे ३९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ५२४१ वर पोहोचला आहे. मुंबईमध्ये शनिवारी १३०८ नवे रुग्ण सापडले आहेत. तसेच ३९ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ३२ जणांना दीर्घकाळ आजार होते. यामध्ये २५ पुरुष तर १४ महिलांचा समावेश आहे. मृतांमधील ३ जणांचे वय ४० वर्षांखाली आहे. २६ जण हे ६० वर्षांवरील, तर १० जण हे ४० ते ६० वर्षादरम्यान होते. ३९ मृत्यू हे गत ४८ तासांमधील आहेत.

मुंबईत कोरोनाचे ९३१ संशयित रुग्ण सापडल्याने मुंबईतील संशयित कोरोना रुग्णांची संख्या ६३ हजार ६६७ वर पोहचली आहे. तसेच १४९७ रुग्णांना घरी सोडण्यात आल्याने आतापर्यंत मुंबईतून तब्बल ६३ हजार ४३१ जणांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती पालिकेच्या साथरोग नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -