घरमहाराष्ट्रदिवाळीत जखमी पशु-पक्ष्यांचे प्रमाण घटले

दिवाळीत जखमी पशु-पक्ष्यांचे प्रमाण घटले

Subscribe

गेल्या दोन-तीन वर्षांच्या तुलनेत यंदा फटाक्यांमुळे जखमी होणाऱ्या पशू-पक्ष्यांच्या संख्येत ५० ते ६० टक्के घट झाली आहे.

दिवाळी म्हटलं की दिवे, रोषणाई आणि फटाके आलेच. फटाके वाजवण्यात जितकी मजा येते, तितकेच त्याचे दुष्परिणामही दिसतात. फटाक्यांमुळे प्रदूषण तर होतंच. पण, प्राण्यांनाही इजा पोहोचते. पण, यावेळेस मुंबईकरांनी दिवाळीत फारच कमी फटाके फोडले असल्याचा अहवाल ‘आवाज फाउंडेशन’कडून देण्यात आला आहे. त्यामुळे, प्रदूषणच नव्हे, तर प्राणी जखमी होण्याच्या घटनाही कमी झाल्या.

जखमी पशु-पक्ष्यांचे प्रमाण ५० ते ६० टक्क्यांनी घटले

परळच्या बैलघोडा या हॉस्पिटलमधून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या दोन-तीन वर्षांच्या तुलनेत यंदा फटाक्यांमुळे जखमी होणाऱ्या पशू-पक्ष्यांच्या संख्येत ५० ते ६० टक्के घट झाली आहे. हे केवळ जनजागृतीमुळे शक्य झालं असल्याचं हॉस्पिटल प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. दिवाळीच्या फटाक्यांमुळे मुक्या जीवांनाही त्रास होतो. पण, गेल्या वर्षांच्या तुलनेत यंदा फटाक्यांमुळे त्रास झालेल्या पशु-पक्ष्यांचं प्रमाण कमी झालं आहे. जखमी पशु-पक्ष्यांचे तब्बल ६० टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाण कमी झाल्याचं डॉक्टर सांगतात. हे दृष्य जरी समाधानकारक असलं तरी याबाबत आणखी जनजागृती होणं गरजेचं आहे. पण, यंदा मुंबईकरांनी खऱ्या अर्थाने ग्रीन दिवाळी साजरी केलीय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

यंदा दिवाळीत फटाक्यांमुळे त्रास झालेल्या पशू-पक्ष्यांमध्ये ५० ते ६० टक्क्यांनी घट झाली आहे. सतत केल्या जाणाऱ्या जनजागृतीमुळे लोकं आता फटाके जास्त प्रमाणात फोडत नाही. यंदा हॉस्पिटलमध्ये फटाक्यांमुळे जखमी होऊन प्राणी येण्याचं प्रमाण कमी आहे. पण, घाबरुन, बिथरलेले प्राणी दाखल झाले आहेत. ११ कुत्रे, ७ मांजरी, २० पक्षी, ७ घारी, १ घुबड, दोन कोकीळा आणि १ लव बर्डचा या प्राण्यांमध्ये समावेश आहे.
– जे.सी खन्ना, बैलघोडा हॉस्पिटल, सचिव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -