घरमहाराष्ट्रदुसर्‍या टप्प्याचा प्रचार संपला

दुसर्‍या टप्प्याचा प्रचार संपला

Subscribe

राज्यातील १० मतदार संघात गुरुवारी मतदान

लोकसभा निवडणुकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदान गुरुवारी १८ एप्रिलला होणार आहे. या टप्प्यातील प्रचाराचा मंगळवारी शेवटचा दिवस होता. संध्याकाळी पाच वाजता दुसर्‍या टप्प्यासाठीचा प्रचार संपला. दुसर्‍या टप्प्यात राज्यातील १० मतदार संघात तर देशातील १३ राज्यातील ९७ मतदार संघात गुरुवारी मतदान होणार आहे. या मतदारसंघात मंगळवारी दिग्गज नेत्यांचा सभासंह मतदारांना प्रत्यक्ष भेटण्यावर भर राहिला.दुसर्‍या टप्प्यात बुलढाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर या मतदारसंघात १८ तारखेला मतदान होणार आहे.

सोलापूरमध्ये सुशिलकुमार शिंदे, प्रकाश आंबेडकर आणि जयसिद्धेश्वर स्वामी यांच्यात रंगतदार लढत होणार आहे. नांदेडमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, अमरावतीतील नवणीत राणा यांच्या लढतीकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. पहिल्या टप्प्यात ७ मतदारसंघात मतदान झाले होते, तर दुसर्‍या टप्प्यात १० मतदारसंघात निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. निवडणूक आयोगाने वेगवेगळ्या जाहिरातीतून लोकांना मोठ्या प्रमाणात मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उद्या १७ एप्रिल रोजी सकाळी अकलूज येथे सभा होणार आहे. १८ तारखेला मतदान असल्याने या सभेला काँग्रेसने विरोध करत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. मात्र, अकलूज हे ठिकाण सोलापूर लोकसभा मतदारसंघात येत नसून ते माढा लोकसभा मतदारसंघातील ठिकाण आहे. आणि माढा लोकसभेचे मतदान हे २३ एप्रिल रोजी आहे. त्यामुळे कुठल्याही नियमाचा मंग होत नसल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे.

देशात १६२९ उमेदवारांचे भवितव्य ठरणार
आसाम -५, बिहार -५, छत्तीसगड -३, जम्मू-काश्मीर -२, कर्नाटक -१४, महाराष्ट्र -१०, मणीपूर -१, ओडिशा -५, तामिळनाडू -३९, त्रिपुरा -१, उत्तर प्रदेश -०८, प. बंगाल -३ आणि पुडुचेरी -१ असे देशभरातील १३ राज्यांमध्ये येत्या गुरुवारी १६२९ उमेदवारांचे भवितव्य निश्चित होणार आहे.

- Advertisement -

महाराष्ट्रात एकूण १७९ उमेदवार
महाराष्ट्रात बुलढाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर या मतदार संघात मतदान होणार आहे. त्यासाठी तब्बल १७९ उमेदवार रिंगणात आहेत.

दिव्यांग मतदारांना आगामी लोकसभा निवडणूक अधिक सुलभ होण्यासाठी मतदान केंद्रावर व्हीलचेअर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नाशिक जिल्ह्यात दिव्यांग व्यक्तींसाठी एकूण 1797 व्हीलचेअरची व्यवथा करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -