घरमहाराष्ट्रअनाथ भावंडांना शिक्षण पूर्ण करण्यासाठी बच्चू कडूंनी दिला मदतीचा हात

अनाथ भावंडांना शिक्षण पूर्ण करण्यासाठी बच्चू कडूंनी दिला मदतीचा हात

Subscribe

कोरोनामुळे आई-वडीलांचे छत्र हरपल्याने आज अनेक मुलं पोरकी झाली आहेत. खेड्यापाड्यातील अशा एकाकी पडलेल्या गरीब मुलांचे भविष्य फारचं अंधारमय झाले आहे. अशाच काहीसा प्रसंग चांदूर बाजार जिल्ह्यातील धोंडे कुटुंबियांवर आला. धोंडे व त्यांच्या पत्नीचे कोरोनामुळे एकाकी निधन झाले. त्यामुळे त्यांची पोटची मुलं वाऱ्यावर पडली. आई-वडीलांच्या निधनामुळे या लहान मुलांचे संगोपन त्यांचे आजी आजोबा करत आहेत. मात्र वयानुसार त्यांनीही दोघांच्या संगोपनाची जबाबदारी सांभाळणे अवघड जात आहे. त्यामुळे या मुलांना आई-वडीलांच्या निधनाच्या दुख:बरोबरचं पुढचे भविष्य कसे धडवायचे असे मोठे संकट निर्माण झाले होते. मात्र या अनाथ मुलांच्या मदतीसाठी
राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे.

चांदूर बाजार तालुक्यातील इनायतपूर धोंडे या अनाथ बहिणभावाच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलणार असल्याचे राज्याचे शालेय शिक्षण, महिला व बालविकास, जलसंपदा राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी आज सांगितले आहे. राज्यमंत्री बच्चू कडू यांनी इनायतपूर येथे राहणऱ्या या अनाथ भावंडांच्या घरी भेट दिली देत त्यांच्याशी संवाद साधला.

- Advertisement -

इनायतपूर येथील राजेश सुधाकर धोंडे यांचे २०११ मध्ये आजाराने निधन झाले. त्यानंतर त्यांच्या पत्नी व दोन्ही मुलांच्या आई वैशाली राजेश धोंडे यांचे १६ मे २०२१ रोजी कोरोना आजाराने निधन झाले. त्यामुळे जागृती राजेश धोंडे व सुशांत राजेश धोंडे ही बालके अनाथ झाली. या दोन्ही मुलांचा आजी व आजोबा सांभाळ करीत आहेत. तथापि, त्यांचे वय व परिस्थिती पाहता या भावंडांच्या संगोपनासाठी सर्व मदत केली जाईल, तसेच त्यांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च आपण उचलणार असल्याचे राज्यमंत्री कडू यांनी जाहीर केले. कोरोनामुळे पालक गमावलेल्या अनाथ बालकांसाठी संगोपन योजनाही राबविण्यात येत आहे. त्याचा गरजू बालकांना लाभ मिळवून द्यावा, असेही निर्देश त्यांनी यावेळी प्रशासनाला दिले.


मायग्रेनचा त्रास होतोय? मग व्यायमासह आहारात करा या पदार्थांचा समावेश…

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -