घरCORONA UPDATE'सरकारबद्दल जनतेमध्ये आक्रोश, पण आम्हाला सरकार बनविण्याची घाई नाही' - देवेंद्र फडणवीस

‘सरकारबद्दल जनतेमध्ये आक्रोश, पण आम्हाला सरकार बनविण्याची घाई नाही’ – देवेंद्र फडणवीस

Subscribe

विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सामनाचे संपादक, शिवसेनेचे नेते संजय राऊत यांची शनिवारी झालेल्या गुप्त बैठकीनंतर अनेक तर्क-वितर्क लढवले जात होते. मात्र दोन्ही नेत्यांनी माध्यमांसमोर येऊन भेटीमागचे कारण सांगितले. मात्र तरिही ज्या कारणांसाठी ही भेट झाली, त्या सामनाच्या मुलाखतीबाबत चर्चा करण्यासाठी दोन तास का लागले? असा प्रश्न आता काही नेते खासगीत उपस्थित करत आहेत. या दोन तासांत नेमक्या कोणत्या विषयावर चर्चा झाली असेल याचा कयास लावत असतानाच देवेंद्र फडणवीस यांनी देखील भेटीबाबतची माहिती एका वृत्तसंस्थेला दिली.

हे वाचा – ‘शिवसेनेच्या कंपाऊंडरला हेडलाईनमध्ये राहण्याची भूक’ काँग्रेसच्या नेत्याची राऊत यांच्यावर टीका

- Advertisement -

माझा कॅमेरा देखील मुलाखत रेकॉर्ड करेल

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “सामनाचे संपादक आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना माझी मुलाखत घेण्यासाठी वेळ हवी होती. मी सामनाला मुलाखत देण्यासाठी तयार आहे. मात्र माझी एक अट सांगण्यासाठी आम्ही भेट घेतली होती. ही मुलाखत कोणतीही काटछाट न करता प्रसारीत करावी, तसेच तिथे माझाही कॅमेरा रेकॉर्डिंगसाठी असेल, अशी अट मी घाटली आहे. त्याबद्दल सविस्तर चर्चा करण्यासाठी आम्ही भेटलो होतो.”

- Advertisement -

मात्र या भेटीनंतर महाविकास आघाडी सरकारला नख लावण्याचा तर हा प्रयत्न नाही ना? अशी उलटसुलट चर्चा सुरु झाल्यानंतर फडणवीस यांनीच त्यावर स्पष्टीकरण दिले आहे. “राऊतांच्या भेटीत आमची कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. शिवसेनेसोबत युती करत सत्ता स्थापन करण्याचा भाजपचा कोणताही प्रस्ताव नाही. मात्र या सरकारच्या कामाबद्दल जनतेच्या मनात आक्रोश आहे. त्यामुळे आपल्या कृतीनेच हे सरकार खाली कोसळेल. ज्यावेळी सरकार पडेल, तेव्हा काय करायचे? हे आम्ही बघू. आता तरी आम्हाला सरकार स्थापन करण्याची घाई नाही.”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

वाचा – संजय राऊत यांनी फडणवीसांच्या भेटीनंतर काय प्रतिक्रिया दिली

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -